PM Modi Spends Rs 6500 on advertising: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून म्हणजेच मागील आठ वर्षांमध्ये जाहीरातींवर किती खर्च केला यासंदर्भातील आकडेवारी जाहीर करताना काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वत:चीच पाठ थोपटून घ्यायची सवय असल्याचा टोलाही काँग्रेसने यावेळी लगावला आहे.
“६ हजार ५०० कोटी! मोदी सरकारने सन २०१४ ते आतापर्यंत जाहिरातींवर ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत,” असं काँग्रेसने म्हटलं आहे. तसेच पुढे, “मोदींना हवं असतं तर जाहिरातींवर त्यांनी त्यांचे फोटो छापले असते पण त्यांनी फक्त यासाठी सहा हजार ५०० रुपये थर्च केले आहेत,” असं काँग्रेसने उपरोधिक पद्धतीने म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे अन्य एका ट्वीटमध्ये काँग्रेसने पंतप्रधान मोदी स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहेत. ‘केवळ ६५०० कोटी… २०१४ पासून स्वत:चीच पाठ थोपटण्याचा खर्च ६५०० कोटी रुपये,’ असं काँग्रेसने एक फोटो शेअर करत म्हटलं आहे.
मात्र काँग्रेसने ही आकडेवारी कोणत्या अहवालातील आहे किंवा माहितीचा स्त्रोत काय याबद्दलचा तपशील जाहीर केलेला नाही.