विरोधकांकडून गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार मोदी सरकारवर इतिहास बदलण्याचा, नावं बदलून काँग्रेसच्या खुणा मिटवण्याचा आरोप केला जात आहे. त्यातच आता थेट देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ज्या घरात शेवटपर्यंत वास्तव्य होतं, त्याच्याच नावातून पंडित नेहरूंचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी ‘पंतप्रधान संग्रहालया’चं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच हा निर्णय घेण्यात आला आहे.

कुठे आहे पंडित नेहरूंचं निवासस्थान?

राजधानी दिल्लीत तीन मूर्ती कॉम्प्लेक्समध्ये पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर वास्तव्यास होते. पुढची १६ वर्षं, पंडित नेहरू तिथेच वास्तव्यास होते. याआधी हे निवासस्थान भारताच्या कमांडर इन चिफचं होतं. २७ मे १९६४ रोजी पंडित नेहरूंचं निधन झाल्यानंतर तत्कालीन केंद्र सरकारनं हे निवासस्थान पंडित नेहरूंनाच समर्पित करून त्या ठिकाणी त्यांचं संग्रहालय आणि ग्रंथालय सुरू केलं. पुढे नेहरूंच्या ७५व्या जयंतीनिमित्त, अर्थात १४ नोव्हेंबर १९६४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांनी तीन मूर्ती हाऊस हे निवासस्थान देशाला समर्पित केलं आणि तिथे नेहरूंच्या संग्रहालयाचं उद्घाटन केलं. दोन वर्षांनंतर, १९६६ साली त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी एनएमएमएल अर्थात नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीची स्थापना करण्यात आली.

saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Rajkummar Hirani
राजकुमार हिरानींनी सांगितलं ‘संजू’ चित्रपट बनवण्याचं खरं कारण; म्हणाले, “त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं…”
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Savlyachi Janu Savli
Video: “या रंगाने…”, एकीकडे तिलोत्तमा सावलीला घराबाहेर काढणार, तर दुसरीकडे देवाची तिच्या आयुष्यात एन्ट्री होणार; पाहा प्रोमो
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Chhaava
जेव्हा विकी कौशलला पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पेहरावात पाहिलं तेव्हा…; अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला, “कोणी गोरागोमटा…”

मोदी सरकारनं घेतला निर्णय

दरम्यान, आता याच एनएमएमएलनं या म्युझियमला दिलेलं जवाहरलाल नेहरूंचं नाव वगळण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरापूर्वी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान संग्रहालयाचं उद्घाटन केलं होतं. नेहरूंपासून मोदींपर्यंत सर्व पंतप्रधानांविषयी या संग्रहालयात माहिती, दस्तावेज, फोटो ठेवण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने आता या संग्रहालयाच्या नावातून नेहरुंचं नाव काढण्याचा निर्णय झाला आहे. त्याऐवजी आता हे संग्रहालय ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ या नावाने ओळखलं जाईल.

सोसायटीचे सदस्य कोण?

पंडित नेहरूंचं नाव वगळण्याचा निर्णय घेणाऱ्या एनएमएमएल सोसायटीच्या अध्यक्षपदी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत. याशिवाय इतर २९ सदस्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी अशा इतर काही मंत्री व नेत्यांचा समावेश आहे.

यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनामध्ये उपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. “या सोसायटीच्या नव्या रुपात पंडित जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत देशाच्या सर्व पंतप्रधानांविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच, त्यांनी सामना केलेल्या आव्हानांचीही इथे माहिती आहे. पंतप्रधान हे एक पद नसून ती एक स्वतंत्र संस्थाच असते. कोणतंही इंद्रधनुष्य सुंदर दिसण्यासाठी त्यातील सर्व रंगांचं योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व होणं आवश्यक असतं”, असं राजनाथ सिंह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Story img Loader