पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याकडे बांगलादेश मुक्ती युद्धातील पुरस्कार सुपूर्द केला. वाजपेयी यांच्या मानस कन्या नमिता भट्टाचार्य आणि त्यांचे पती रंजन भट्टाचार्य यांच्याकडे मोदी यांनी हा पुरस्कार सुपूर्द केला. या वेळी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या. बांगलादेशच्या स्वातंत्र्य चळवळीच वाजपेयी यांनी सक्रिय योगदान दिले त्यानिमित्त त्या देशाने अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार वाजपेयींना जाहीर केला होता. आपल्या बांगलादेश दौऱ्यात मोदी यांनी हा पुरस्कार वाजपेयी यांच्या वतीने स्वीकारला

Story img Loader