PM Modi Meet Kapoor Family : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कपूर कुटुंबीयांची नुकतीच भेट घेतली. राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त त्यांनी कपूर कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी काही मजेशीर गोष्टीही घडल्या. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्हिडिओ पोस्ट करत लाईक धिस असं कॅप्शन दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निर्मला सीतारमण यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता रणबीर कपूर म्हणतोय की, तु्म्हाला भेटल्यावर तुम्हाला काय संबोधायचं याची चर्चा आम्ही आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर गेले आठवडाभर करत आहोत. रीमा आत्याने तर मला यासाठी रोज फोन करत होत्या.

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी तुमच्या कुटुंबातीलच एक आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही संबोधू शकता.” यावर दिवंगत राज कपूर यांची कन्या रीमा कपूर म्हणाल्या, “आदरनिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी…” तेवढ्यात नरेंद्र मोदी म्हणाले, “कट…” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या गंमतीमुळे संपूर्ण कपूर कुटुंबीयांमध्ये हशा पिकला.

नरेंद्र मोदींनी कपूर कुटुंबीयांची भेट का घेतली?

बॉलीवूडचे शोमॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांची १४ डिसेंबरला १००वी जयंती आहे. यानिमित्ताने कपूर कुटुंबियांनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. या शताब्दी कार्यक्रमात दिग्गज कलाकार मंडळींसह नेते उपस्थित राहणार आहेत. याच निमित्ताने कपूर कुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यासाठी दिल्लीत गेलं होतं. नीतू कपूर, रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, आलिया भट्ट, आदर जैन, अनीसा मल्होत्रा या कपूर कुटुंबातील सदस्यांनी दिल्लीतील पंतप्रधानच्या निवासस्थानी जाऊन मोदींची भेट घेतली आणि त्यांना आमंत्रण दिलं. 

हेही वाचा >> करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर

अभिनेत्री करीना कपूरने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे फोटो करीनाने शेअर केले आहेत. करीनाने हे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “आमचे दिग्गज आजोबा राज कपूर यांचा विलक्षण जीवनप्रवास चित्रपटांच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. या खास गोष्टीचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यासाठी मोदींची मी आभारी आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत एक खास गोष्ट पाहायला मिळाली. ते म्हणजे मोदी यांनी करीना-सैफची मुलं तैमूर आणि जेहसाठी एक खास भेट दिली. नरेंद्र मोदींनी एका कागदावर टीम ( तैमूर ) आणि जेहचं नाव लिहित स्वतःची सही केली. याचा फोटो करीनाने तिच्या इन्स्टाग्राम आणि स्टोरीला देखील शेअर केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi jokingly says cut while meeting kapoor family sitharaman shares video sgk