संभल : ‘‘कालचक्र बदलले असून, विदेशात नेण्यात आलेल्या देशाच्या पुरातन मूर्ती आपण परत आणत आहोतच परंतु विक्रमी विदेशी गुंतवणूकही देशात होत आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. भारत नावाच्या मंदिराचे पुनर्निर्माण करण्याचे कामगिरी ईश्वराने आपल्यावर सोपवली असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा >>> सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमान अन् छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना, पाहा VIDEO

tulja bhavani temple latest marathi news
दसऱ्याच्या मुहूर्तावर तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
High Court, Ganesh idol POP, Ganesh idol,
पीओपीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना नको, बंदीचे काटेकोर पालन करण्याबाबत मंडळांना माहिती द्या, उच्च न्यायालयाचे आदेश
Chandrapur, Wekoli, electronic weighing machine, fraud, crores of rupees loss, electronic chip, Ramnagar police, Faiz Traders, Vekoli employees,
चंद्रपूर : वजन काट्यात चीप लावून गैरप्रकार, वेकोलीच्या चार जणांविरूध्द गुन्हा
What is the price of gold on Shri Krishna Janmashtami
श्रीकृष्ण जन्माष्टमीला सोन्याचे दर बघून ग्राहक चिंतेत.. झाले असे की…
JP Singh arrest, Praveen Dhule murder case, Nalasopara, land mafia, Central Crime Branch, absconding accused
प्रवीण धुळे हत्या प्रकरण फरार आरोपीला १६ वर्षानंतर अटक
Badlapur Crime News : School Male Cleaner Abuse Girls in Badlapur| Badlapur News Updates in Marathi After the incident in Badlapur the district collector ordered to check the Sakhi Savitri committees in schools
Badlapur School Case : बदलापूरातील घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना आली जाग; शाळांमध्ये सखी सावित्री समित्या आहे की नाही, हे तपासण्याचे आदेश
Vaijapur Gangapur protest by grounds of hurting religious sentiments
वैजापूर, गंगापूर येथे धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून टायर जाळून रास्ता रोको, जोरदार निदर्शने

उत्तर प्रदेशमधील संभल येथे श्री कल्की धाम मंदिराचे भूमिपूजन केल्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, की एकीकडे तीर्थक्षेत्र विकसित केली जात असताना दुसरीकडे शहरांत आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. उच्च तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधाही निर्माण केल्या जात आहेत. आज मंदिरे बांधली जात असतानाच देशभरात नवी वैद्यकीय महाविद्यालयेही उभारली जात आहेत. आज आपली पुरातन शिल्पेही परदेशातून परत आणली जात आहेत आणि विक्रमी विदेशी गुंतवणूकही येत आहे. हा बदल म्हणजे कालचक्र फिरल्याचा पुरावा आहे, असे ते म्हणाले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  हेही उपस्थित होते.

हेही वाचा >>> AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार? आयबीएम इंडियाचे प्रमुख काय म्हणतात नक्की वाचा!

विविध मंदिरांचे दाखल

गेल्या महिन्यातच देशाने अयोध्येत तब्बल ५०० वर्षांनी रामजन्मभूमी मंदिर पूर्ण झाल्याचे पाहिले. देशापासून शेकडो किलोमीटर दूर अरब भूमीवर अबुधाबीमध्ये पहिल्या भव्य मंदिराचे उद्घाटनही आपण पाहिले आहे. या काळात आपण वाराणसीच्या विश्वनाथ धामचे वैभव बहरत असल्याचे पाहिले आहे. महाकालाच्या महालोकाचा महिमा पाहिला. सोमनाथचा विकास, केदारेश्वर मंदिराच्या खोऱ्याची पुनर्रचना आपण अनुभवली. ‘विकासाबरोबरच वारसाही’ हा मंत्रानुसार आपली वाटचाल सुरू आहे.