आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मोठय़ा प्रमाणावर योगासनांचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सरकारच्या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असमर्थ ठरले असल्यानेच ते अशा प्रकारची ‘नौटंकी’ करीत असल्याचा आरोपही दिग्विजयसिंह यांनी केला आहे.
भारत सरकारच्या वतीने योगासनांचा कार्यक्रम आयोजित करण्यामागील प्रयोजन काय तेच कळत नाही, असे दिग्विजयसिंह म्हणाले. तथापि, उत्तम आरोग्यासाठी योगासनांची शिफारस करणे ही बाब समजण्यासारखी असली तरी त्याला धार्मिक-राजकीय स्वरूप का देण्यात आले ते अनाकलनीय आहे, असेही ते म्हणाले.

 

Story img Loader