जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला क्रिकेट सामना पाहायला गेले, मात्र हिंसाग्रस्त मणिपूरला ते गेले नाहीत अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा विजय झाल्यास त्याचे श्रेय घेण्यासाठी मोदी गेले होते असा दावाही प्रियंका यांनी केला.
हेही वाचा >>> गांधी कुटुंबाला पापांची किंमत चुकवावी लागेल; ‘नॅशनल हेराल्ड’च्या मालमत्ता जप्त केल्यानंतर भाजपची टीका
राजस्थानातील शाहपुरा येथे प्रचारसभेत बोलताना प्रियंका म्हणाल्या, की ‘‘अलिकडेच विश्वचषकामध्ये आपला संघ स्वत:च्या कष्टाने अंतिम सामन्यात पोहोचला. संघ जिंकला तर त्याचे श्रेय आपल्यालाही घेता येईल या विचाराने मोदी तिथे पोहोचले’’. जिथे अभिमान आणि सन्मानाची बाब असते तिथे पंतप्रधान जातात पण संकटाच्या परिस्थितीपासून ते दूर राहतात अशी टीका त्यांनी केली.
पुढे प्रियंका यांनी प्रश्न विचारला, की मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात तर मग त्यांच्या कार्यकाळात भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष कसा झाला? पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार मोठया उद्योजकांचे कर्जे माफ करते पण गरिबांकडे दुर्लक्ष करते या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.