जनता दल यूनायटेडचे ( जेडीयू ) राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलून ‘नरेंद्र मोदी संविधान’ लागू होईल, असा दावा ललन सिंह यांनी केला आहे. ते बिहारमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ललन सिंह म्हणाले, “२०२४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात बदल केला जाईल. त्याजागी ‘नरेंद्र मोदी संविधान’ देशात लागू होईल. हे भीतीदायक आहे. त्यामुळे जनतेची भूमिका महत्वाची आहे.”

हेही वाचा : “राजीव गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट…”, सोनिया गांधी यांचं मोठं विधान

“निवडणुका आल्यावर लोकांच्या भावना भडकावून मते घेतली जातात. २०१४ ते २०२३ या नऊ वर्षाच्या कार्यकाळात काय कामे केलीत, हे पंतप्रधान मोदींनी सांगितलं पाहिजे,” असे आव्हानही ललन सिंह यांनी दिलं आहे.

हेही वाचा : “भारतीय राज्यघटना बदलली पाहिजे”; पंतप्रधान मोदींच्या सल्लागाराचं विधान, आव्हाड म्हणाले, “हा विचार…”

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्यामुळे टीकास्र डागण्यात येत आहे. “देशाचे पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत आहात. पण, स्वत:च्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळता येत नाही,” अशी टीका भाजपाने केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi retain power in 2024 will bring narendra modi constitution say jdu chief lalan singh ssa
Show comments