देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर काही ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने चिंता वाढली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य, डीपीआयआयटी, स्टील, रोड ट्रान्सपोर्ट मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत देशातील ऑक्सिजन पुरवठा आणि ते पुरवण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या. वाढती मागणी पाहता ऑक्सिजन निर्मिती करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर स्टील प्लांटना देण्यात येण्याऱ्या अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा आरोग्य वापरासाठी करण्यास सांगितलं आहे.

देशात ऑक्सिजन पुरवठा करण्याऱ्या टँकर्सना सूट देण्यासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. कोणतीही अडवणूक न करता देशात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितलं आहे. ड्रायव्हरर्सनंही दोन शिफ्टमध्ये काम करत योग्य ठिकाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. सिलिंडर भरण्याऱ्या कंपन्यांनी २४ तास काम करण्याची तयारी ठेवावी अशी विनंतीही केली आहे. तसेच नायट्रोजन आणि अरगोन पुरवठा करण्याऱ्या टँकर्सनाही ऑक्सिजन पुरवठा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण परिस्थितीबाबत जाणून घेतलं. ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता होऊ नये यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. पुढचे १५ दिवस १२ राज्यांमध्ये (महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडु, पंजाब, हरयाणा आणि राजस्थान) ऑक्सिजन लागेल’, असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

अदर पुनावालांची जो बायडेन यांना हात जोडून विनंती; ट्विट करत म्हणाले….

‘केंद्र आणि राज्यांमध्ये या परिस्थितीबाबत संवाद होत आहे. सध्याच्या परिस्थितीत २० एप्रिल, २५ एप्रिल आणि ३० एप्रिलला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल. ४८८० मेट्रीक टन, ५,६१९ मेट्रीक टन आणि ६,५९३ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा या तारखांना करण्यात येईल’ असंही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Story img Loader