टंकारा (गुजरात) : ‘‘भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षणव्यवस्था ही काळाची गरज आहे,’’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील टंकारा येथे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळयास दूरदृश्य प्रणालीद्वारे मोदींनी संबोधित केले.

मोदींनी यावेळी समाजसुधारक दयानंद सरस्वती यांची प्रशंसा केली. ते म्हणाले, की भारतीय जनता जेव्हा गुलामीच्या बेडयांत अडकली होती. देशात मोठया प्रमाणात अंधश्रद्धा पसरलेली असताना दयानंद यांनी भारतीय समाजाला वेदांकडे परतण्याचे आवाहन केले होते. आपल्या रूढीवादी परंपरा आणि अंधश्रद्धांसारख्या सामाजिक दुराचारामुळे विज्ञाननिष्ठ विचारसरणी मागे पडल्याने आपले कसे नुकसान झाले, आपल्या एकतेला धोका निर्माण झाल्याचे स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्यावेळी आपल्याला दाखवून दिले.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
amit shah in jalgaon during campaigning
भाजपचा अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्यास विरोध; अमित शहा यांच्याकडून भूमिका जाहीर
Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
ajit pawar jayant patil
Ajit Pawar: “ऊस उत्पादकांना पैसे देऊ न शकणाऱ्यांना मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न”, अजित पवारांची जयंत पाटलांवर बोचरी टीका

हेही वाचा >>> BJP Rajya Sabha Candidate List: भाजपचे राज्यसभेसाठी १४ उमेदवार घोषित

भारतीय संस्कृती आणि अध्यात्मापासून दुरावणाऱ्या समाजघटकांना वेदांकडे परण्याचे आवाहन दयानंदांनी केले. ते केवळ एक वैदिक ऋषी नव्हते तर राष्ट्रचेतनेचे ऋषी होते. तत्कालीन इंग्रज सरकार आपल्या सामाजिक कुप्रथा अधोरेखित करून भारतीयांची अवहेलना करत असे आणि ब्रिटिश सरकार कसे योग्य आहे, असे ठसवत असे. मात्र ब्रिटिशांच्या या कारस्थानाला दयानंद सरस्वतींच्या आगमनाने मोठा शह बसला असे मोदी म्हणाले.

आर्य समाजाच्या संस्थापक असलेल्या स्वामी दयानंद यांनी वेदांचे तार्किक अर्थ लावले. बुरसटलेल्या रुढीवादी लोकांवर खुलेआम हल्ला केला आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे खरे स्वरूप प्रकट केले अशी प्रशंसा पंतप्रधानांनी केली. परिणामी समाजात आत्मविश्वास परत येऊ लागला. वैदिक धर्म जाणून घेऊन जनतेची त्याच्यासी नाळ जुळू लागली. लाला लजपत राय, राम प्रसाद बिस्मिल आणि स्वामी श्रद्धानंद यांसारखे अनेक क्रांतिकारकांवर आर्य समाजाचा प्रभाव होता, असे सांगून मोदी म्हणाले की, त्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहिले होते. या ‘अमृतकाळात’ आपण आधुनिक भारताची जडणघडण केली पाहिजे. 

३७० जागांवर विजयाचा विश्वास

झाबुआ : ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ३७० जागांचा टप्पा ओलांडेल,’’ या विश्वासाचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी रविवारी केला. मध्य प्रदेशात सात हजार ५५० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी सोहळयानंतर पंतप्रधान मोदी झाबुआ येथील जाहीर सभेत बोलत होते. काँग्रेसला निवडणुकीच्या वेळीच गावे, गरीब आणि शेतकरी आठवतात अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

भारतीय मूल्याधारित शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज आहे. आर्य समाजाच्या शाळा आतापर्यंत त्याचे केंद्र होत्या. देश आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे याचा विस्तार करत आहे. या प्रयत्नांनी समाजाला सांधण्याची आपली जबाबदारी आहे. नरेंद्र मोदी, पंतप्रधान