पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी संविधान दिनानिमित्त ट्विटरवरून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी ज्या स्त्री-पुरूषांनी अथक प्रयत्न केले त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचे मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. भारतीय नागरिकांनी संविधानातील आदर्श आणि मुल्यांचे पालन करावे आणि आपल्या पूर्वजांना अभिमान वाटेल अशा भारताची निर्मिती करावी, असे आवाहनही मोदींनी यावेळी जनतेला केले.
राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांमध्ये आज, २६ नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीनेही संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची स्वतंत्र राज्य घटना अंगिकृत व अधिनियमित करून स्वतप्रत अर्पण करण्यात आली. तो दिवस संविधान दिन म्हणून मानण्यात येतो.

Story img Loader