अभिनेत्री रश्मिका मंदाना, कटरिना कैफ यांसह अनेक अभिनेत्री डीपफेक तंत्रज्ञानाला बळी पडल्या आहेत. डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अनेक अभिनेत्रींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची केंद्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. तर, आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गैर तंत्रज्ञानाची दखल घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, डीपफेक हा सध्या भारतीय व्यवस्थेला भेडसावत असलेल्या सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एक आहे. यामुळे समाजात अराजकता निर्माण होऊ शकते. वाढत्या समस्येबद्दल लोकांना शिक्षित करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी माध्यमांना केले. “डीपफेकसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराच्या बाबतीत नागरिक आणि प्रसारमाध्यम दोघांनीही सतर्क राहण्याची गरज आहे”, असंही मोदी म्हणाले.

it is not good for person holding post of Prime Minister visiting house of Chief Justice of country on occasion of Ganapati Puja
गोंदियाः ‘हे’पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही,कॉग्रेसचे चेनीथल्ला म्हणतात,‘मुख्य न्यायाधीशांच्या घरी…’
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Narendra Modi Wardha tour Union Ministry of Micro and Small Scale Vishwakarma Yojana Programme
आमचे काय ? पंतप्रधानांचा दौरा आणि भाजप नेत्यांना पडला पेच, जिल्हाधिकाऱी म्हणतात हा तर…
Wardha, Narendra Modi, Nitesh Karale master,
वर्धा : सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन् संतप्त मात्र कराळे गुरुजी! काय आहे कारण?
Ajit Pawar private secretary, Supriya Sule,
बारामतीत शासकीय कार्यक्रमात अजित पवारांंचा खासगी सचिव व्यासपीठावर?; राजशिष्टाचारात बदल केले का? सुप्रिया सुळेंचा सवाल
Taloja, industrial smart city, smart city,
तळोजाची औद्योगिक स्मार्ट सिटीकडे वाटचाल
PM Narendra Modi, Wardha,
पंतप्रधान मोदी २० ला वर्धेत! देशभरातून २० हजार ‘विश्वकर्मा’ हजेरी लावणार
PM Narendra Modi in palghar marathi news
वाढवण बंदराचे आज पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन, मोठ्या रोजगार संधी निर्माण करणारा प्रकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गरबा खेळतानाचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबत त्यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, मी लहानपणापासून गरबा खेळलेलो नाही”. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधानांसारखा दिसणारा एक पुरुष काही महिलांसोबत डान्स करताना दिसत आहे. फॅक्ट चेकनुसार, असे आढळून आले आहे की व्हिडिओमध्ये डीपफेकचा वापर झालेला नसून ती व्यक्ती प्रत्यक्षात पंतप्रधानांसारखीच दिसणारी असून त्यांचं नाव विकास महंते आहे. ते एक अभिनेते आहेत.

हेही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गरबा डान्स पाहिलात का? ‘या’ व्यक्ती मुळे होतोय पाहणाऱ्यांचा गोंधळ, खरं आलं समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हायरल झालेल्या व्हिडिओचे बॅकग्राउंड आणि डान्सर्सचे आउटफिट व्हायरल झालेल्या व्हिडिओप्रमाणेच होते. यासंदर्भात Artist’s manager या Instagram प्रोफाइल ला संपर्क केला जे विकास महंते यांचे प्रोफाइल मॅनेज करते. त्यांनी पुष्टी केली की व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती प्रत्यक्षात विकास महंते आहे, जे हुबेहुब पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा दिसतात.