रशियाने युक्रेनविरोधात २४ फेब्रुवारीपासून पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. जवळजवळ ३५ मिनिटं दोन्ही देशांचे प्रमुख नेते एकमेकांशी बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधील परिस्थितीची माहिती घेतली. मोदी आणि झेलेन्स्कींच्या फोन कॉलदरम्यान तीन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. (युद्धाचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

नक्की पाहा >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदींनी केलं त्या गोष्टीचं कौतुक…
पंतप्रधान मोदींनी युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांकडून तेथे सुरु असणारं युद्ध आणि आगामी काळातील परिस्थितीबद्दल सविस्तर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेन आणि रशियादरम्यान सातत्याने संवाद साधण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत त्याचं कौतुक केलं.

आभारही मानले…
युक्रेन आणि रशियामध्ये संवाद सुरु असल्याबद्दल दोन्ही देशांकडून होणाऱ्या प्रयत्नांबद्दल कौतुक करतानाच पंतप्रधान मोदींनी युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांचे आभारही मानले. युक्रेन सरकारकडून युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप देशाबाहेर काढण्यासाठी स्थानिक सरकार जी मदत करतंय त्याबद्दल मोदींनी व्लोदिमिर झेलेन्स्की यांचे आभार मानले.

नक्की वाचा >> Ukraine War: दोघांचं भांडण चीनचा लाभ! निर्यात भरमसाठ वाढली, आकडेवारी पाहून थक्क व्हाल

मोदींनी व्यक्त केली ही अपेक्षा…
भारत सरकारच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी यावेळेस युक्रेन सरकारकडून आगामी काळामध्ये सुमे शहरात अडकलेल्या भारतीयांना देशाबाहेर काढण्यासाठीही सरकार्य मिळेल अशी अपेक्षा व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी बोलताना व्यक्त केली.

पुतिन यांच्यासोबत केलेली चर्चा…
काही दिवसांपूर्वीच म्हणजेच तीन मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी रशियनं राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. यावेळीही पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सेफ कॉरिडोअर म्हणजेच सुरक्षित मार्ग निर्माण करण्यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी पुतिन यांच्याकडे केलेली.

नक्की वाचा >> Ukraine War: पोप फ्रान्सिस यांचा पुतिन यांना दणका; म्हणाले, “युक्रेनमध्ये रक्त आणि अश्रूंच्या नद्या…”

तटस्थ भूमिका…
रशिया युक्रेन युद्धामध्ये भारताची भूमिका तटस्थ राहिली आहे. संयुक्त राष्ट्रांनी या युद्धासंदर्भात घेतलेल्या मतदानामध्ये भारताने अनुपस्थित राहत तटस्थ भुमिका घेतली होती. पंतप्रधान मोदी यापूर्वीही युद्ध सुरु झाल्यानंतर लगेचच पुतिन यांच्याशी फोनवरुन बोलले होते.

नक्की वाचा >> Ukraine War: “मी मेलो तरी…”; पाळीव बिबट्या, ब्लॅक पँथरला युक्रेनमध्ये सोडून येण्यास भारतीयाचा नकार

सर्वात आधी चर्चा केली तेव्हा चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं केलेलं आवाहन…
तीन मार्चपूर्वी उभय नेत्यांमध्ये २४ फेब्रुवारीला चर्चा झाली होती. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली होती. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’ या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi speaks with zelenskyy appreciates direct dialogue between ukraine and russia scsg