रशिया आणि युक्रेनमध्ये २४ फेब्रुवारीपासून सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुपारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर काही वेळांनी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत चर्चा केली. मोदींनी झेलेन्स्कींसोबत ३५ मिनिटं चर्चा केली तर पुतिन यांच्यासोबत मोदींचा कॉल जवळजवळ ५० मिनिटं सुरु होता अशी माहिती एएनआयने सरकारी सुत्रांच्या हवाल्याने दिलीय. (युद्धाचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा) पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये यापूर्वी युद्ध सुरु झाल्यापासून फेब्रुवारी २४ आणि तीन मार्च रोजी चर्चा झालेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युक्रेनसोबतच्या वाटाघाटींची दिली माहिती…
पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांचं फोनवरुन बोलणं झालं. हा कॉल जवळजवळ ५० मिनिटं सुरु होता. त्यांनी युक्रेनमधील परिस्थितीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनसोबत सुरु असणाऱ्या वाटाघाटीच्या चर्चेमधील अटी आणि शर्थींबद्दल माहिती दिली, असं भारत सरकारच्या सुत्रांनी सांगितलं.

नक्की पाहा >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

थेट चर्चेचा सल्ला…
यावेळी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना थेट युक्रेनशी चर्चा करावी असा सल्ला दिला. पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना त्यांच्या टीमच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या वाटाघाटीच्या चर्चेच्या सत्रांबरोबरच थेट चर्चाही करावी असा सल्ला मोदींनी दिला, असं सुत्रांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> Ukraine War: दोघांचं भांडण चीनचा लाभ! निर्यात भरमसाठ वाढली, आकडेवारी पाहून थक्क व्हाल

मोदींकडून दोन्ही पक्षांचं कौतुक…
पंतप्रधान मोदींनी यावेळी दोन्ही देशांनी चर्चा करुन सुरक्षित मार्ग तयार करण्यासाठी युद्धविरामासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल दोन्ही पक्षांचं कौतुक केलं. या युद्धबंदीच्या घोषणेमध्ये सुमे शहराचाही समावेश असून तेथे हजारो भारतीय अजूनही अडकून पडलेत. या शहराचा उल्लेखही मोदींनी केल्याचं सुत्रांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: पोप फ्रान्सिस यांचा पुतिन यांना दणका; म्हणाले, “युक्रेनमध्ये रक्त आणि अश्रूंच्या नद्या…”

पुतिन यांनी दिला शब्द…
लवकरात लवकर सुमे शहरामधून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर जोर देत पंतप्रधानांनी या गोष्टीचं महत्व पुतिन यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला असंही सुत्रांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. सुमेमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना आश्वस्त करत शब्द दिल्याचंही सुत्रांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> Ukraine War: “मी मेलो तरी…”; पाळीव बिबट्या, ब्लॅक पँथरला युक्रेनमध्ये सोडून येण्यास भारतीयाचा नकार

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

झेलेन्स्कींसोबतच्या चर्चेतही सुमेचा मुद्दा…
पुतिन यांच्यासोबतच्या कॉल आधी मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी युक्रेनकडून भारतीयांना देशाबाहेर निघण्यासाठी केल्या जाणाऱ्या मदतीसाठी युक्रेन सरकारचे आभार मानले. तसेच त्यांनी यापुढेही असेच सहकार्य सुमेमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केलीय.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

चार दिवसांपूर्वीच झालेली चर्चा…
पंतप्रधान मोदी यापूर्वीही युद्ध सुरु झाल्यानंतर लगेचच पुतिन यांच्याशी फोनवरुन बोलले होते. तीन मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. यावेळीही पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सेफ कॉरिडोअर म्हणजेच सुरक्षित मार्ग निर्माण करण्यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी पुतिन यांच्याकडे केलेली.

नक्की वाचा >> Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”

सर्वात आधी चर्चा केली तेव्हा चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं केलेलं आवाहन…
तीन मार्चपूर्वी उभय नेत्यांमध्ये २५ फेब्रुवारीला चर्चा झाली होती. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली होती. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’ या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केलं होतं.

नक्की वाचा >> Ukraine War: “या गुलाबाच्या फुलाचं काय करु? त्यापेक्षा…”; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्याची केंद्र सरकारवर टीका

तटस्थ भूमिका…
रशिया युक्रेन युद्धामध्ये भारताची भूमिका तटस्थ राहिली आहे. संयुक्त राष्ट्रांनी या युद्धासंदर्भात घेतलेल्या मतदानामध्ये भारताने अनुपस्थित राहत तटस्थ भुमिका घेतली होती. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi spoke to russian president putin phone call lasted for about 50 min scsg