आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया हे केवळ साधन नव्हे तर, एक मोठी ताकद बनले आहे. देशभरातले असंख्य युवक हे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सएप आणि तत्सम सोशल मीडियात कार्यरत असतात. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी निवड होण्याआधीच व राष्ट्रीय पातळीवर येण्याआधीच गुजरातचे विकास पुरूष म्हणुन सोशल मिडियात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनी सोशल मिडियाची ताकद , व्याप्ती व त्याचे भविष्य ओळखत भारतातील बहुतेक नेत्यांआधी त्यांनी सोशल मिडियाचा शितापिने वापर केला होता. आज पुन्हा त्याचीच प्रचीती आली आहे. पंतप्रधानांचे इंग्रजीमध्ये असणारे संकेतस्थळ आज सहा प्रादेशिक भाषांमध्ये सुरु करण्यात आले.
यापूर्वी, पंतप्रधानांचे संकेतस्थळ इंग्रजीमध्ये होते. ही संकेतस्थळ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे जनता आता पंतप्रधांनांशी अधिक चांगल्या पद्धतीने संपर्क साधू शकणार आहे. नवी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या सहाही संकेतस्थळ लाँच केली. यामध्ये बंगाली, गुजराती, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि मराठीचा समावेश आहे. दरम्यान, पीएमओचे संकेतस्थळ सहा भाषांमध्ये लाँच करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत.
EAM Swaraj inaugurates 6 language (Bengali,Marathi,Gujarati,Malayalam, Tamil&Telugu) versions of PMO India website pic.twitter.com/gGDwDWcaOV
— ANI (@ANI_news) May 29, 2016