पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा उमेदवारी अर्ज २६ एप्रिलला त्यांचा उमेदवारी अर्ज वाराणासीतून दाखल करणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. भाजपाच्या सूत्रांनीही यासंदर्भातली माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ एप्रिलला वाराणसी मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २५ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात पोहचतील. त्यानंतर तिथे ते रोड शो करतील. त्याचप्रमाणे बनारास हिंदू विद्यापीठालाही भेट देतील असे समजते आहे.

रोड शोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काळभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतील तिथे पूजा अर्चा करतील त्यानंतर गंगा आरतीही करतील. तसेच २५ एप्रिलचा उर्वरित दिवस ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत घालवतील असेही समजते आहे. कदाचित ते पत्रकारांशीही संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

२०१४ मध्ये प्रचाराच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी अशाच प्रकारे रोड शो घेतले होते. तसंच विजयानंतरही पंतप्रधा नरेंद्र मोदींनी वाराणसीत विजय रॅली काढली होती. वाराणसीत सातव्या टप्प्यात म्हणजेच १९ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी मोदी २६ एप्रिलला अर्ज दाखल करणार आहेत.