करोना रुग्णांची संख्या काही राज्यांमध्ये पुन्हा वाढू लागल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळेच करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी काय काय तयारी करण्यात आलीय याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत डिजीटल माध्यमातून बैठक घेणार आहेत. ज्या राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यापैकी महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि ओडिसा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदी चर्चा करणार आहेत. करोना परिस्थिती नियोजनासंदर्भात या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. मागील मंगळवारी पंतप्रधानांनी पूर्वेकडील राज्यांमधील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मागील काही दिवसांपासून या सहा राज्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी पूर्वेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तेव्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारे आणि बाजारांमध्येही मास्क न घालताच फिरणाऱ्या लोकांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच मोदींनी मायक्रो कंनटेन्मेंट झोनवरही जोर दिला. मोदींनी गुरुवारी वाराणसीचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी भाषणामध्ये करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये बेजबाबदारपणा घातक ठरु शकतो, असा इशारा दिला.

बैठकीमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि ओडिसामधील लसीकरणासंदर्भातील आणि करोना आकडेवारीसंदर्भात चर्चा होणार आहे. केरळ वगळता या सहा राज्यांपैकी पाच राज्यांमध्ये देशातील एकूण करोना रुग्णसंख्येपैकी ७३.४ टक्के रुग्ण आहेत. १३ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये देशामध्ये एकूण ५५ असे जिल्हे आहेत जिथे करोना चाचण्यांमधील पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांहून अधिक होता.

ओडिसा आणि तामिळनाडू या राज्यांचं नाव लसींचा तुटवडा असणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये आहे. ओडिसामध्ये लसीकरणाच्या तुटवड्यामुळे मागील आठवड्यामध्ये लसीकरण मोहीम थांबवण्यात आलेली. राज्याचे आरोग्य सचिव पी.के. महापात्रा यांनी, जुलै महिन्यामध्ये कोव्हिशील्डचे २५ लाख डोस राज्याला देण्यात आले होते. मात्र आम्हाला या महिन्यामध्ये दुसरा डोस देण्यासाठी किमान २८ लाख ३० हजार लसींची गरज असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच लसींची पुढची खेप पोहचल्यानंतरच लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल असंही महापात्रा यांनी स्पष्ट केलं होतं. त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्येही मागील आठवड्यामध्ये लसींचा तुटवडा होता. शनिवारी राज्यामधील १८ जिल्ह्यांमध्ये एकही लस शिल्लक नव्हती. त्यामुळेच रविवारी रात्री केंद्र सरकारने तामिळनाडूमध्ये पाच लाख लसी पाठवल्या. कोव्हिशिल्डचे पाच लाख डोस तातडीने तामिळनाडूला पाठवण्यात आले होते. आजच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांकडून या सर्व गोष्टींचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.