पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. जो बायडेन यांची त्यांनी भेट घेतली. तसंच अमेरिकन संसदेत भाषणही केलं. दहशतवादाशी दोन्ही देशांनी संयुक्तपणे लढण्याची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या बाहेरही त्यांनी भाषण केलं. त्यानंतर स्टेट डिनरसाठी विशेष पाहुणे आले होते. यामध्ये मुकेश अंबानी, नीता अंबानी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश होता.

मुकेश अंबानी, नीता अंबानी, आनंद महिंद्रा, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, सत्या नाडेला, इंद्रा नुई, अॅपलचे सीईओ टिम कूक या सगळ्यांना डिनरसाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. एवढंच नाही तर स्टेट डिनरमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, विदेश सचिव विनय क्वात्रा, अमेरिकेन स्पीकर नॅन्सी पॅलोसी आणि भारतातले अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटीही उपस्थित होते. स्टेट डिनरसाठी ४०० जणांना निमंत्रण दिलं गेलं होतं. भारतीय वंशाचे अमेरिकन प्रतिनिधी रो खन्ना आणि राजा कृष्णमुर्ती यांचीही उपस्थिती होती.

Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Raja Ranichi Ga jodi Fame Actress Kelvan
फिश फ्राय, सोलकढी, गोडाचे पदार्थ अन्…; ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्रीचं ‘असं’ पार पडलं केळवण, फोटोंनी वेधलं लक्ष
Aishwarya Narkar
मालिका संपल्यानंतर कोकणात पोहोचल्या ऐश्वर्या नारकर, चुलीवर केला स्वयंपाक; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या..
Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Amol Mitkari : छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट, राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “ही राजकीय भेट…”
madhuri dixit husband dr shriram nene asked to pose solo at event
मिस्टर अँड मिसेस नेनेंचा डॅशिंग लूक! माधुरी दीक्षितसाठी पतीने केलं असं काही…; ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक
Winter Session Cabinet portfolio allocation Eknath Shinde gets housing along with urban development
गृह खाते मुख्यमंत्र्यांकडेच, शिंदे यांच्याकडे नगरविकाससह गृहनिर्माण; अजित पवारांकडे अर्थ मंत्रालय
Sanjay Shirsat On Guardian Minister Post
Sanjay Shirsat : खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्री पदावरुन महायुतीत रस्सीखेच? शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याचा मोठा दावा

डिनरच्या मेन्यूमध्ये मॅरिनेट बाजरी, मक्याचं सॅलेड, भरवां मशरूम, टरबूज, तिखट अॅव्हीकॉडो सॉस, पोर्टेबलो मशरूम या पदार्थांचा समावेश होता. तसंच गोड पदार्थांमध्ये गुलाब वेलचीचे स्ट्रॉबेरी शॉर्ट केक आणि इतर अनेक पदार्थ होते. या डिनरचा सगळ्यांनीच आस्वाद घेतला.

आणखी कोण कोण होतं स्टेट डिनरमध्ये?

हुमा आबेदीन आणि हेबा आबेदीन
रीम एकरा आणि डॉ. निकोलस तब्बल
माला एडिगा
रेवती अद्वैथी आणि जीवन मुलगुंड
केट डेव्हिस अहमद
किरण आहूजा
सॅम ऑल्टमॅन आणि ऑलिवर मुलहेरिन
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन आणि चार्लेन ऑस्टिन
बेला बजारिया आणि रेखा बजारिया
भरत बराई, पन्ना बराई

यासह ४०० निमंत्रितांचा समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या संसदेला संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला. एवढंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी AI चा नवा अर्थही सांगितला. AI म्हणजे अमेरिका-इंडिया असं नरेंद्र मोदी म्हणाले.

दहशतवादाच्या मुद्द्यावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांननी अमेरिकेवर झालेला ९/११ चा हल्ला आणि भारतावर झालेला २६/११ चा दहशतवादी हल्ला याबाबत आपल्या भाषणात भाष्य केलं. ते म्हणाले, “दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू आहे. हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावं लागेल. आपल्या देशांची एकजूट या दहशतवादाचा सामना करु शकते. मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतरही दहशतवादाचा धोका आहेच. त्याचा बिमोड करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे.

Story img Loader