भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ८८व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी शुभेच्छा देण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी गेले होते. तत्पूर्वी मोदींनी ट्विटरवरून अडवाणींना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना केली. आमचे प्रेरणास्थान, देशाच्या उत्कर्षासाठी अथक परिश्रम घेणारा भारतातील एक महान नेता, अशा शब्दांत मोदींनी अडवाणींची प्रशंसा केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्याशिवाय अन्य केंद्रीय मंत्र्यांनीही अडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  लालकृष्ण अडवाणी यांनी १९९८ ते २००४ या वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय गृहमंत्रीपद भुषविले होते. मात्र, मोदींचे भाजपमधील प्राबल्य वाढल्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह लालकृष्ण अडवाणी बाजूला सारले गेले होते. अडवाणींची रवानगी पक्षाच्या सल्लागार मंडळात करून त्यांना मुख्य निर्णयप्रक्रियेपासून दूर करण्यात आले होते.

Story img Loader