पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोबेल शांतता पुरस्काराच्या मच्छराने चावा घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना तर आधीच या पुरस्काराच्या मच्छाराने चावा घेतला होता. अशी टीका काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केली आहे. मोदी-शरीफ यांच्या भेटीत काय झाले, हे राष्ट्राला त्यांनी सांगितलेच पाहिजे, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमावरही तिवारी यांनी टीका केली आहे. ऑल इंडिया रेडिओचा गैरवापर थांबला पाहिजे, पंतप्रधान जर सार्वजनिक प्रसारणसेवेचा वापर करत असतील तर, विरोधीपक्षांनाही ही संधी मिळाली पाहिजे.मन की बात हा राजकीय कार्यक्रम नाही, त्यामुळे या कार्यक्रमातून राजकारणकरण्यापेक्षा लोकांना यात सहभागी होण्याची संधी दिली पाहिजे, असे तिवारी यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा