PM Narendra Modi In USA : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. विविध राजकीय कार्यक्रमांदरम्यान आज त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांची भेट घेतली. यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षांनी मोदींना आणि मोदींनी अध्यक्षांसह फर्स्ट लेडी यांना काही भेटवस्तू दिल्या. नरेंद्र मोदी यांनी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा ग्रीन डायमंड दिला. तर अध्यक्ष जो बायडेन यांना चंदनाच्या लाकडापासून बनलेली पेटी भेट म्हणून दिली आहे. या पेटीत त्यांच्यासाठी अनेक भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या वतीने अध्यक्ष जो बायडेन यांना दिलेल्या भेटवस्तूंमधून भारतीय संस्कृतीची एक झलक पाहायला मिळते. त्यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये विविधतेने नटलेल्या भारतातील विविध राज्यांची ओळख असलेल्या वस्तूंचा समावेश आहे.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

म्हैसूरमधल्या चंदनापासून बनलेली लाकडी पेटी जी जयपूरमधल्या तज्ज्ञ शिल्पकाराने बनवली आहे. यामध्ये गणपती बाप्पांची सुबक अशी चांदीची मूर्ती जी कोलकात्यातल्या एका तज्ज्ञ कारागिराने घडवली आहे. यामध्ये एक पणती देखील आहे.

हे ही वाचा >> बायडेन यांनी जिनपिंग यांचा हुकूमशहा उल्लेख केल्याने चीनचा संताप

या चंदनाच्या पेटीत चांदीच्या १० छोट्या डब्या आहेत. यामध्ये १० भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये पंजाबमधलं तूप, राजस्थानमधलं २४ कॅरेट हॉलमार्क केलेलं सोन्याचं नाणं, ९९.४ कॅरेट चांदीचं नाणं, महाराष्ट्राचा गूळ, उत्तराखंडचा तांदूळ, तामिळनाडूतले तीळ, भूदानाचं प्रतीक म्हणून (भूमीचं दान)कर्नाटकातल्या चंदनाचा तुकडा, गोदानाचं (गायीचं दान) प्रतीक म्हणून पश्चिम बंगालमधल्या कारागिरांनी घडवलेला चांदीचा नारळ, झारखंडमधलं हाताने विणलेलं रेशमी कापड, गुजरातमधलं मीठ देण्यात आलं आहे.