पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर एक देणगीची पावती शेअर करत इतरांनाही देणगी देण्याचं आवाहन केलं. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी देशाच्या पंतप्रधानांनी असं आवाहन करण्यावर आक्षेप घेत टीका केली. भाजपाने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पक्षासाठी देणगी अभियान सुरू केलं आहे. त्याचाच भाग म्हणून मोदी आणि शाहांनी पक्षाला दिलेल्या १,००० रुपयांच्या देणगी पावतीची पोस्ट करत पक्षाला देणगी देण्याचं आवाहन केलं. यावरच काँग्रेसने निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदींनी पक्षनिधी म्हणून १,००० रुपये दान केल्याची पावती ट्वीट करत म्हटलं, “मी भारतीय जनता पार्टीला १,००० रुपयांचा पक्षनिधी देणगी म्हणून दिलाय. आपला आदर्श कायमच देश सर्वप्रथम राहिला आहे. तुमच्या छोट्या देणगीमुळे पक्षाची निस्वार्थ सेवेची संस्कृती अशीच पुढे जाईल.”
“भाजपाला दिलेली प्रत्येक देणगी एका सशक्त आणि नव्या भारतासाठीचं योगदान”
अमित शाह यांनी देखील अशाचप्रकारचं ट्वीट केलंय. शाह यांनी म्हटलं, “भाजपाला दिलेली प्रत्येक देणगी एका सशक्त आणि नव्या भारतासाठीचं योगदान आहे. तुम्ही नमो अॅपवर जाऊनही देणगी देऊ शकता. मी देणगी दिलीय, तुम्हा सर्व कायकर्ते आणि समर्थकांना विनंती की त्यांनी देणगी द्यावी आणि इतरांना प्रोत्साहित करावं.”
मोदी आणि शाहांच्या या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतोय. यात एकीकडे भाजपा समर्थक या अभियानाचं कौतुक करत आपणही देणगी केल्याची पावती पोस्ट करत आहेत. दुसरीकडे काही लोक देशाच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी एका पक्षासाठी अभियान चालवण्यावर आक्षेप घेत आहेत. तसेच महागाई, इंधन दरवाढ असे मुद्देही उपस्थित केले जात आहेत.
”भारताचे पंतप्रधान देखील?”, काँग्रेस नेते श्रीनिवास यांचा सवाल
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १००० रुपयांच्या देणगीवर प्रतिक्रिया देताना ”भारताचे पंतप्रधान देखील?” असं म्हणत प्रश्न उपस्थित केला. अन्य एका युजरने (@GJyoti) अमित शाहांच्या ट्वीटवर म्हटलं, “आम्ही आधीपासूनच खूप कर देत आहोत, तर मग आम्हाला वेगळी देगणी देण्याची गरज काय आहे. पेट्रोलच्या किमती, प्रवासावर खर्च, स्वयंपाक घरातील वस्तू अशा सर्वच गोष्टींच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. तुम्ही लोक इवढ्या पैशांचं काय करत आहात?”
हेही वाचा : “मी तुम्हाला हिंदू म्हणजे काय सांगतो, याचा अर्थ…”, राहुल गांधींचं अमेठीमध्ये मोदींवर टीकास्त्र!
“राजकीय पक्षांना देणगी देण्यापेक्षा गरीबांना मदत करा”
अशाचप्रकारे अन्य एका युजरने (@AnwaRPathaN0) म्हटलं, “राजकीय पक्षांना देणगी देण्यापेक्षा आपल्या जवळच्या गरीबांना मदत करा, त्याचा उपयोग होईल, पण हे नेते कुणाचेही नसतात.” एका युजरने (@kalagirsa) तर स्वतः भाजपा कार्यकर्ता असल्याचं सांगत भाजपाला देणगी कशासाठी हवी? असा प्रश्न विचारला. “माझ्यासारख्या भाजपा कार्यकर्त्याला देखील भाजपाला देणगी कशासाठी हवी हे पचत नाहीये.