समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. आज पहाटे १ ते २ च्या दरम्यान महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स बस ही नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. तेव्हा सिंदखेडराजा पिंपळखुटा परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आठ जणांचा जीव वाचला आहे.
या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची, तर जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.
“महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेनं अतिशय दु:ख झाले आहे. अपघातातील ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबाबरोबर माझ्या प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत,” असं ट्वीट पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाने केलं आहे.
“बुलढाणा बस दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून २ लाखांची, तर जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येईल,” असेही पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही अपघातावर ट्वीट करत दु:ख व्यक्त केलं आहे. “महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात झालेला अपघात हा दुर्दैवी आहे. अपघातात मृत व्यक्तींच्या कुटुंबाबरोबर माझ्या सहवेदना आहेत. स्थानिक प्रशासनाद्वारे जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थन करतो,” असं अमित शाहांनी म्हटलं आहे.