PM Narendra Modi And Rahul Gandhi : संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करण्यात आले आहे. वक्फ बोर्ड ठरावादरम्यान वाद झाल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. परंतु, त्यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी संसदेत चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेत राहुल गांधींनीही या कार्यक्रमात उपस्थिती लावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एकाच फ्रेममध्ये दाखवणारे दुर्मिळ दृश्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

PM Modi
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर! ‘या’ तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
MLA Satej Patil urged workers after assembly defeat
विधानसभा अपयशाने खचणार नाही ; उभारी घेऊ सतेज पाटील
Sujay Vikhe Patil On Shirdi Sai Sansthan
Sujay Vikhe : ‘महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत, शिर्डीतील मोफत जेवण बंद करा’, सुजय विखेंचं विधान चर्चेत
NCP Ajit Pawar On January 18th and 19th Chintan camp organized at Chhatrapati Sambhajinagar
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मोर्चेबांधणी, १८, १९ जानेवारीला अजित पवार गटाचे छ. संभाजीनगरला शिबीर

पावसाळी अधिवेशन पुढे ढकलल्यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत झालेल्या चहापानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि इतर अनेक नेते उपस्थित होते, असे IANS ने पोस्ट केले. या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु, संसदेच्या नियमानुसार अधिवेशन संपल्यानंतर आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमात यंदा सर्वपक्षीय नेते उपस्थित असल्याचं दिसलं.

हेही वाचा >> Jagdeep Dhankhar : “जया बच्चन, तुम्ही सेलिब्रिटी असाल पण हे सभागृह आहे”; सभापतींनी खडसावलं!

संसदेचे पावसाळी अधिवेशन तहकूब

२२ ऑगस्ट सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन १२ ऑगस्ट रोजी संपणार होते. परंतु, ते आज ९ ऑगस्ट रोजीच तहकूब करण्यात आले. कसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले. तसंच, राज्यसभेचे कामकाजही तहकूब करण्यात आले.

१८व्या लोकसभेच्या दुसऱ्या सत्राच्या समारोपाचं भाषण देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माहिती दिली की सुमारे ११५ तास चाललेल्या या अधिवेशनात १५ बैठका झाल्या. तर, अधिवेशनादरम्यान सभागृहाची उत्पादकता १३६ टक्के होती, अशी माहिती बिर्ला यांनी एएनआयला दिली.

आज राज्यसभेत काय घडलं?

दरम्यान, आज पुन्हा एकदा राज्यसभेचे सभापती जगदीप घनखड यांनी जया बच्चन यांच्या नावाचा उल्लेख करताना ‘जया अमिताभ बच्चन’ असा केला. यावर बोलताना, जया बच्चन यांनी पुन्हा आक्रमक होत नाराजी व्यक्त केली. मी जया अमिताभ बच्चन, आज हे सांगू इच्छिते की मी एक कलाकार आहे. मला इतरांची देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव समजतात. तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहात, मला पण तुमचा बोलण्याचा टोन हा मान्य नाही. आपण सहकारी आहोत, असं त्या म्हणाल्या.

Story img Loader