नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपतींना निमंत्रण न देता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत आहे. त्याचा निषेध करत या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय १९ भाजपातेर विरोधी पक्षांनी बुधवारी घेतला. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाला टोला लगावला आहे.
पंतप्रधान मोदी जापान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या दौऱ्यावरून दिल्लीतील विमानतळावर पोहचले. भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा आणि अन्य नेत्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिडनीतील एक दाखला देत विरोधी पक्षाला लक्ष्य केलं.
“सिडनीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला २० हजार लोक उपस्थित होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीस, माजी पंतप्रधान आणि पूर्ण विरोधी पक्ष आपल्या देशासाठी एकत्र आला होता,” असे सांगत मोदींनी बहिष्कार टाकणाऱ्या विरोधी पक्षावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
हेही वाचा : ‘या’ १२ घटनांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर; म्हणाले, “हे सगळे…!”
राहुल गांधींचं मोदी सरकारवर टीकास्र
“संसदेची उभारणी अहंकाराच्या विटांनी व्हे, तर घटनात्मक मुल्यांनी होते. नव्या संसंद भवनाच्या उद्घटनाचे निमंत्रण राष्ट्रपतींना न देण्याची भूमिका हा त्यांचा अवमान आहे,” असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हटलं.
हेही वाचा : नव्या संसदेच्या उद्घाटनाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारी, जनहित याचिकेतून केली ‘ही’ मागणी
“सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण”
“नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण सर्व राजकीय पक्षांना देण्यात आलं आहे. हे पक्ष आपापल्या मतांनुसार निर्णय घेतील,” असं गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं.