पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भाजपाने नाहीतर, शिवसेनेने युती तोडली नाही, असं हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. तसेच, २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ( एनडीए ) विजय होणार, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केल्याचं ‘इंडिया टुडे’ला सूत्रांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्रातील ‘एनडीए’च्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं. तेव्हा बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भाजपाने नाहीतर, शिवसेनेनं युती तोडली. विनाकारण वाद निर्माण करण्यात आले, तरीही आम्ही ते सहन केलं. एकीकडे सत्तेत राहायचं आणि दुसरीकडे टीका करायची, हे कसं चालणार?”

हेही वाचा : “शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही, कारण…”, नरेंद्र मोदींचं वक्तव्य

“बिहारमध्ये २०२० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा ७४ जागा आणि जनता दल युनायटेडला ( जेडीयू ) ४३ जागा मिळाल्या होत्या. तरीही, नितीश कुमारांना मुख्यमंत्री करण्यात आलं,” असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

“काँग्रेसप्रमाणे भाजपा अहंकारी नाही. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा विजय होणार,” असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

हेही वाचा : “लोकसभेत नारायण राणे वैचारिक उंचीप्रमाणे बोलले, त्यामुळे…”, अरविंद सावंत यांची टीका

संजय राऊतांचं पंतप्रधानांना प्रत्युत्तर

“शिवसेनेनं युती तोडली, असं पंतप्रधान मोदी म्हणत असतील, तर ते दिशाभूल करत आहे. २०१४ ची परिस्थिती पंतप्रधानांना आठवायला हवी. २०१४ साली युती कोणी आणि का तोडली हे संपूर्ण देशानं पाहिलं. त्यानंतर शिवसेना स्वतंत्र लढली. आपली युती तुटली, आपण वेगळे झाले आहोत, असं भाजपातर्फे अधिकृतपणे एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितलं. त्यामुळे शिवसेनेची साथ कोणी सोडला, याचे जुने रेकॉर्ड पंतप्रधानांनी तपासून पाहावे,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.