पोखरण (राजस्थान) : ‘‘पोखरण हे भारताचे स्वावलंबन, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाचे साक्षीदार बनले आहे,’’असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी येथे काढले. ‘पोखरण फील्ड फायरिंग रेंज’ येथे तिन्ही संरक्षण दलांचा ‘भारत शक्ती’ हा समन्वयित सराव सुमारे ५० मिनिटे चालला. येथे स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उत्पादने-उपकरणांची प्रात्यक्षिके करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भारतीयांचे नागरिकत्व अबाधित! अधिसूचनेविरोधात न्यायालयात याचिका, देशभरात संमिश्र प्रतिक्रिया, दिल्लीत सुरक्षेत वाढ

जैसलमेर शहरापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर हा सराव आयोजित करण्यात आला होता. स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान ‘तेजस’ने गर्जना करत आकाशभरारी मारली आणि प्रगत तंत्रज्ञानयुक्त हलके हेलिकॉप्टर ‘एमके-४’ने उड्डाण करत आपल्या सामर्थ्यांचे दर्शन घडवले. तर मुख्य लढाऊ रणगाडे ‘अर्जुन’ आणि ‘के-९’ वज्र, धनुष आणि सारंग यांच्या तोफखाना यंत्रणांनी जमिनीवर मारा करून आपली ताकद अधोरेखित केली. पिनाक उपग्रह प्रणालीद्वारे संचलित यंत्रणा आणि अनेक ‘ड्रोन’ने प्रेक्षकांना भुरळ घातली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते.