देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या मुद्यांवर अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. या मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोपदेखील झाले आहेत. ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरुन विरोधकांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी ‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबतचा एक अहवाल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने सरकारकडे दिला. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वन नेशन,वन इलेक्शन’ मुद्यांवर भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “वन नेशन वन इलेक्शन ही आमची कटिबद्धता आहे. यासंदर्भात आम्ही संसदेमध्येही चर्चा केली. याबाबत आम्ही एक समितीही स्थापन केली होती. या समितीचा अहवालही आलेला आहे. या अहवालामध्ये अनेकांनी सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण सूचना केल्या आहेत. जर आम्ही हा अहवाल अंमलात आणू शकलो, तर देशाला खूप फायदा होईल”, असे पंतप्रधान मोदी यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
quiziframe id=30 dheight=282px mheight=417px
हेही वाचा : ‘राम मंदिर झाले, पण आग लागली नाही’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर पलटवार
पंतप्रधान मोदी ईडीच्या कारवाईवर म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी-सीबीआयच्या कारवाईच्या मुद्यांवरही भाष्य केले. ते म्हणाले, “ईडीच्या कारवाईमध्ये ९७ टक्के अराजकीय व्यक्तींवर कारवाई झाली आणि फक्त तीन टक्के राजकीय लोकांवर कारवाई झाली. ईडीने गेल्या १० वर्षात २२०० कोटी कॅश जप्त केले. मात्र, २०१४ सालच्या आधी फक्त ३४ लाख रुपये कॅश जप्त केले होते”. दरम्यान, युक्रेनमध्ये युद्ध सुरु होते, त्यावेळच्या मुद्यांवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. भारतातील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे आपल्या देशात आणण्यात आल्याचे सांगत ही एक मन हेलावणारी घटना होती, असे ते म्हणाले.