पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्य क्षेत्राशी संबंधित विविध घटकांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, ब्रिक्स शिखर परिषदेसह जागतिक मुद्द्यांबाबत चर्चा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ९ आणि १० सप्टेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे जी-२० शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी असमर्थता व्यक्त केली. परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह हे जी-२० शिखर परिषदेत रशियाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तसेच, भारताच्या जी-२० अध्यक्षतेला सतत पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रध्यक्ष पुतिन यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : ‘ब्रिक्स’ गटात सहा नवे देश घेण्यामागे काय उद्देश? भारतासाठी याचा अर्थ काय?

यंदाचे जी-२० अध्यक्षपद भारताकडे आले आहे. इंडोनेशियाकडून १ डिसेंबर २०२२ रोजी भारताने जी-२० चे अध्यक्षपद स्विकारलं होतं. दरम्यान, ९ आणि १० सप्टेंबरला नवी दिल्ली जी-२० शिखर परिषद होणार आहे. या परिषदेला जागतिक नेते हजर राहणार आहेत.