पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी भारतीय सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करतात. यंदाची दिवाळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कारगिल द्रास येथे भारतीय सैनिकांबरोबर साजरी केली आहे. यावेळी त्यांनी सैनिकांशी संवाद साधला. तसेच यावेळी सैनिकांना संबोधित करताना भारतीय जनान हेच माझे कुटुंबीय आहेत. यापेक्षा गोड दिवाळी असू शकत नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ऋषी सुनक होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान? फक्त एक पाऊल दूर; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

कारगिलची ही भूमी सामर्थ्याचे प्रतिक आहे. या भूमिला नमन करण्याची भावना मला पुन्हा पुन्हा येथे घेऊन येते. माझ्यासाठी मागील कित्येक वर्षापासून देशातील सैनिक हेच माझे कुटुंबीय आहेत. तुमच्यामध्ये आल्यानंतर माझी दिवाळी आणखी गोड होते. माझ्या दिवाळीचा उत्साह तुमच्याजवळ आहे. मला मागील कित्येक वर्षांपासून तुमच्यासोबत दिवाळी साजरी करता येते. हे माझे सौभाग्यच आहे, असे नरेंद्र मोदी सैनिकांना उद्देशून म्हणाले.

हेही वाचा >>> ‘सबका साथ, सबका विकास’ची प्रेरणा प्रभू रामचंद्रांकडून : मोदी

तुमच्या (सैनिक) शौर्यासमोर आकाशदेखील झुकतो. कारगिलचे क्षेत्र भारतीय सेनेच्या शौर्याचे प्रतिक आहे. शिखरावर बसलेला शत्रूदेखील भारतीय सेनेच्या साहसासमोर छोटा होतो. तुम्ही (सैनिक) सीमेचे रक्षक असून देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहात. तुम्ही देशाच्या सीमेवर आहात म्हणून देशातील लोक सुखात आहेत. देशाच्या सुरक्षेला संपूर्णता देण्यासाठी आपला प्रत्येक नागरिक प्रयत्न करत आहे. देशाची सीमा सुरक्षित असते, अर्थव्यवस्था सुदृढ असते आणि समाज आत्मविश्वासने ओतप्रोत असते तेव्हाच देश सुरक्षित असतो. देशाच्या ताकदीबद्दल ऐकल्यानंतर सैनिकांचेही मनोबल वाढत असेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा >>> क्षी जिनिपग तिसऱ्यांदा चीनचे अध्यक्ष ; माओ यांच्यानंतर सर्वाधिक प्रभावशाली नेते

आज देशातील नागरिक स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी झालेला आहे. गरीब व्यक्तीला पक्के घर, पिण्याचे पाणी, स्वयंपाकासाठी गॅस वेळेवर मिळतो, तेव्हा देशातील सैनिकालाही अभिमान वाटतो. सैनिकाच्या शहरात, गावात जेव्हा सुविधा पोहोचतात तेव्हा सीमेवर त्याला चांगले वाटत असते, असेही मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi celebrate diwali with soldiers in kargil said army and soldiers are my family prd