मागील काही महिन्यांत मणिपूरमधील हिंसाचारात अनेक नागरिकांचा जीव गेला. तसेच महिलांवर अत्याचाराच्या घटनाही घडल्याचं समोर आलं. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरात मणिपूर हिंसाचाराचा विषय चर्चेत आला. आज (१५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ला येथे साजरा होत असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणात मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं. तसेच काही दिवसांपासून तेथे शांतता प्रस्तापित झाली आहे, असं नमूद केलं.

नरेंद्र मोदी म्हणाले, “मागील काही आठवड्यांमध्ये ईशान्य भारतात विशेष करून मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. त्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. मात्र, काही दिवसांपासून सातत्याने तेथे शांतता प्रस्थापित झाल्याची बातमी येत आहे. देश मणिपूरमधील नागरिकांबरोबर आहे.”

suraj chavan will get new home by next diwali
सूरज चव्हाण ‘या’ दिवशी हक्काच्या घरात प्रवेश करणार! भर सभेत अजित पवारांनी दिला शब्द; म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राला…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Bigg Boss Marathi season 5 winner suraj Chavan speech at Ajit Pawar Baramati Sabha
Video: तोंड लपवत सूरज चव्हाणची अजित पवारांच्या बारामती सभेत एन्ट्री, एका मिनिटांचं केलं भाषण; म्हणाला, “दादांना झापूक झुपूक…”
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
Snehal Tarde
“मी फार प्रेमात…”, लग्नात प्रवीण तरडेंकडे स्नेहल तरडेंनी मागितलेली ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “आयुष्यात कधीही…”
om puri and shabana azmi
“लोक जेवायला बोलवायचे तेव्हा आम्ही…”, शबाना आझमींनी सांगितला ओम पुरी यांच्याबरोबरचा किस्सा; म्हणाल्या…
sukanya mone reveals she got call from manoj joshi wife at midnight 2 pm
सुकन्या मोनेंना मध्यरात्री २ वाजता फोन केला अन् विचारलेलं…; ‘आभाळमाया’तील ‘त्या’ सीनमुळे मनोज जोशींच्या पत्नीवर झालेला परिणाम
Rohini Hattangadi
“‘बाईपण भारी देवा’च्या रिलीजनंतर मी म्हटलं होतं…” रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितली आठवण

व्हिडीओ पाहा :

“शांततेतूनच मणिपूर हिंसाचारावर मार्ग निघेल”

“मणिपूरमधील लोकांनी मागील काही दिवसांपासून शांतता प्रस्थापित केली आहे. त्यांनी हे शांततेचं पर्व पुढे न्यावं. शांततेतूनच या प्रश्नावर मार्ग निघेल. राज्य आणि केंद्र सरकार त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भरपूर प्रयत्न करत आहे आणि करत राहील,” असं मोदींनी म्हटलं.

हेही वाचा : Independence Day 2023 Live : आपला भारत देश हा सर्वात मोठी लोकशाही ठरला- मोदी

“देशातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे कल्पनेच्या पलिकडील संकटं”

“देशातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे कल्पनेच्या पलिकडील संकटं निर्माण झाली. यात अनेक कुटुंबांना नुकसान सहन करावं लागलं. त्या कुटुंबांप्रती मी संवदेना व्यक्त करतो. राज्य-केंद्र सरकार एकत्र येऊन त्या सर्व संकटांवर मात करत वेगाने विकासाकडे आगेकुच करेल, असा मी विश्वास व्यक्त करतो,” असंही मोदींनी नमूद केलं.