पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शासकीय पदावर कार्यरत होऊन आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. आजपासून (७ ऑक्टोबर) २० वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. “२० वर्षांपूर्वी याच दिवशी मला जनतेची सेवा करण्याची नवी जबाबदारी मिळाली. लोकांची सेवा करण्याचा, लोकांमध्ये राहण्याचा माझा प्रवास अनेक दशकांपूर्वी सुरु झाला होता. परंतु, आजच्या दिवशी २० वर्षांपूर्वी मला गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून नवीन जबाबदारी मिळाली होती”, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान कार्यालयाने याबाबतचं ट्विट केलं आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मोदींवर आता भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व गुणांचं कौतुक केलं जात आहे. तीन दशकांहून अधिक काळासाठी मोदींचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींच तोंडभरून कौतुक केलं आहे. “२००१ साली आजच्या दिवशी सुशासन आणि विकासाचा हा प्रवास सुरू झाला. जेव्हा नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा प्रवास आत्तापर्यंत अविरत सुरु आहे”, असं अमित शाह म्हणाले. “पंतप्रधानांनी जनतेसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी अहोरात्र काम केलं आहे”, असंही शाह म्हणाले.

Story img Loader