PM Narendra Modi Critisice Garibi Hatao Campaign by Congress : निवडणुकीच्या जुमल्यावरून काँग्रेसने सातत्याने भाजपावर टीका केली आहे. आता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या सर्वाधिक मोठ्या जुमल्याविषयी आज संसदेत सांगितले. ते संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवास चर्चेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गरिबी हटाओ हा भारतातील सर्वांत मोठा जुमला होता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ही घोषणा सर्वप्रथम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी १९७१ मध्ये लोकसभा निवडणुकीत केली होती. “काँग्रेसला एक शब्द खूप आवडतो. तो शब्द मला आज वापरायचा आहे. जुमला या शब्दाशिवाय ते जगू शकत नाहीत. त्यांचा तो आवडता शब्द आहे. भारतात चार पिढ्या काँग्रेसने दिलेला एक जुमला होता. गरिबी हटाओ हा तो जुमला. यामुळे त्यांना राजकारणात मदत केली”, असं मोदी म्हणाले.

हेही वाचा >> PM Narendra Modi : नरेंद्र मोदींनी संसदेत पंडित नेहरूंचं ‘ते’ विधान वाचून दाखवलं; इंदिरा गांधींवरही टीकास्र!

“काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानाला इजा पोहोचवण्यास कोणतीही कसर सोडली नाही. ५५ वर्षे एकाच कुटुंबाने राज्य केलं. त्यामुळे देशात काय काय झालं हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. या कुटुंबाचे कुविचार, कुरिती, कुनीती याची परंपरा निरंतर सुरू आहे. प्रत्येक स्तरावर या परिवाराने संविधानाला आव्हान दिले”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

संविधान सभेत जे करू शकले नाहीत ते मागच्या दाराने केलं

“१९४७ ते १९५२ या देशात इलेक्टेड सरकार नव्हतं. एक सिलेक्टेड सरकार होतं. निवडणुका झाल्या नव्हत्या. अंतरिम व्यवस्थेच्या रुपाने सरकार स्थापन झालं होतं. १९५२ च्या पूर्वी राज्यसभेचंही गठण झालं नव्हतं. जनतेचा कोणताही आदेश नव्हता. त्याच काळात संविधान मंथन करून संविधान तयार झालं होतं. १९५२ मध्ये सरकार तयार झालं, तेव्हा त्यांनी ऑर्डियन्स करून संविधान बदललं. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला. हा संविधान निर्मात्यांचाही अपमान होता. त्यांना जशी संधी मिळाली त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला हातोडा मारला. हा संविधान निर्मात्यांचा घोर अपमान आहे. आपल्या मनाप्रमाणे संविधान सभेत करू शकले नाहीत ते त्यांनी मागच्या दाराने केलं. ते निवडून आलेल्या सरकारचे पंतप्रधान नसतानाही त्यांनी हे पाप केलं” असंही टीकास्र त्यांनी डागलं.

त्याच काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. “जर संविधान आमच्या मार्गात येत असेल तर कोणत्याही परिस्थिती संविधानात परिवर्तन केलं पाहिजे”, अशा आशयाचं पत्र तत्कालीन पंडित नेहरूंनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं, असं मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi critisice garibi hatao campaign of congress sgk