पॅरिस :फ्रान्सचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुक्रवारी सन्मानित करण्यात आले. हा मान मिळणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांना हा सन्मान प्रदान केला. अध्यक्षीय प्रासाद ‘एलिसी पॅलेस’मध्ये गुरुवारी मोदींना हा सन्मान व किताब प्रदान करण्यात आला. 

दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, ब्रिटिश राजे चार्ल्स (तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स), जर्मनीच्या माजी चान्सलर अँजेला मार्केल, संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस बुत्रोस बुत्रोस घाली आदी मान्यवरांना याआधी ही सन्मान प्रदान करण्यात आला आहे. मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स भेटीसाठी गुरुवारी पॅरिसमध्ये दाखल झाले, तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शुक्रवारी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन ‘बॅस्टिल डे’च्या समारंभात ते अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले. त्यात हवाई दलाच्या विमानांसह भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांची पथके सहभागी झाली होती. फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस किंवा ‘बॅस्टिल डे परेड’ हे मुख्य आकर्षण होते.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!

 मोदींनी ‘ट्वीट’ केले, की, मी नम्रतापूर्वक ‘लीजन ऑफ ऑनर’चा ‘ग्रँड क्रॉस’ स्वीकारतो. भारतातील १४० कोटी जनतेचा हा सन्मान आहे. त्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, सरकार आणि जनतेचे आभार व्यक्त करतो. याद्वारे भारताविषये त्यांचे नितांत प्रेम आणि उभय देशांतील मैत्रीसंबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, की हा सन्मान पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमुख जागतिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल प्रतिबिंबित करतो. जागतिक घडामोडींत ज्यांचे नेतृत्व अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देण्यासाठी आपण सहभागी होऊ या. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एलिसी पॅलेसमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळय़ाची छायाचित्रे ‘ट्विटर’वर प्रसृत केली.

फ्रान्सच्या राष्ट्रीय सोहळय़ात विशेष अतिथी!

पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळय़ानिमित्त आयोजित केलेल्या ‘बॅस्टिल डे’ संचलनाला विशेष अतिथी म्हणून शुक्रवारी सहभागी झाले. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांची पथके या संचलनात सहभागी झाली. या वेळी झालेल्या शानदार संचलनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या वेळी भारतीय हवाई दलातील राफेल लढाऊ विमानांनीही फ्रेंच लढाऊ विमानांसह या संचलनात हवाई सलामी दिली.

मोदींनी ‘ट्वीट’ केले की, आपली वसुंधरा शांत, समृद्ध आणि शाश्वत विकासासाठी भारताने आपल्या पुरातन मूल्यांनुसार सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे. १४० कोटी भारतीय नागरिक एक मजबूत आणि विश्वासार्ह भागीदार फ्रान्सचे नेहमीच ऋणी राहतील. हे नाते अधिक दृढ होवो. मॅक्रॉन यांनी ‘ट्वीट’ केले की, जगाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेला दिग्गज, महत्त्वपूर्ण भविष्यकालीन भूमिका बजावणारा, धोरणात्मक भागीदार आणि मित्र असलेल्या भारताचे १४ जुलैच्या सन्माननीय अतिथी म्हणून स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटतो. १४ जुलै रोजी भारतीय सैनिक आणि राफेल विमान आमच्या सैनिकांसोबत संचलनात सहभागी होत आहेत.

सुशील शिंदेंचा फ्रान्समधील हवाई कवायतींमध्ये सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने बॅस्टिल डे परेड दरम्यान पॅरिसमध्ये झालेल्या हवाई कवायतींमध्ये भारतीय हवाई दलाची तीन राफेल लढाऊ विमाने फ्रेंच विमानांसह सहभागी झाली होती. यात परभणी जिल्ह्यातील स्क्वॉड्रन लीडर सुशील शिंदे यांना या हवाई कवायतींमध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला होता.  सुशील शिंदे हे परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील रहिवासी आहेत. ते सातारा सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. आपला मुलगा या कवायतींमध्ये सहभागी झाला ही अतिशय अभिमानास्पद घटना असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगतिले.