पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ट्विट करून देशातील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि सुसंवादाची भावना वृद्धिंगत होवो, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

देशभरात आज बकरी ईदचा सण उत्साहात साजरा केला जातोय. या सणाला ‘ईद-उल-अज़हा’ किंवा ‘ईद-उज़-जुहा’ असेही म्हणतात. सूर्योदय आणि सूर्यास्त या दरम्यानच्या काळाला अजहा किंवा जुहा म्हणतात. जिलहिज्जा या अरबी महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईदचा सण साजरा केला जातो. याच महिन्यात मुस्लिम लोक हज यात्रेसाठी प्रयाण करतात. मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधवांकडून बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात या सणासाठी बकरी ईद हे नाव प्रचलित झाले आहे. या दिवशी मुस्लिम व्यक्ती आपल्या ऐपतीनुसार बकरे खरेदी करून त्यांची कुर्बानी देतात. संपूर्ण जगात साधारण अशाच पद्धतीने हा सण साजरा केला जातो. आपल्याला प्रिय असणाऱ्या गोष्टीचा त्याग करण्याच्या वृत्तीचे प्रतीक म्हणून कुर्बानी दिली जाते.

Story img Loader