अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक मैत्रिचे किस्से तुम्ही आजवर ऐकले असतील. त्यात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं तोडभरून कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी मोठे व्यक्तीमत्व आहे. ते अत्यंत उत्कृष्ट काम करत आहेत, अशी स्तुतीसुमने ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींवर उधळली आहेत. ते एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “पंतप्रधान मोदी आणि मी चांगले मित्र आहोत. पंतप्रधान मोदी हे मोठे व्यक्तीमत्व असून, चांगल्या पद्धतीने आपले काम करत आहेत. आम्ही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतो.”

राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशिवाय तुमचे भारताशी संबंध चांगले आहेत का? यावरती ट्रम्प यांनी सांगितलं की, “मला वाटतं माझे भारताशी नाते तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारायला हवे. मात्र, भारताला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पेक्षा चांगला मित्र कधी मिळाला असेल.”

2024 साली तुम्ही पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहणार का? त्यावर ट्रम्प यांनी म्हटलं, “मी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक लढावी, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. सध्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मी सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे निवडणुकीबाबतचा माझा निर्णय लवकरच जाहीर करणार आहे,” असेही ट्रम्प यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi great doing teffic job say former us president donald trump ssa