पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांना रशियातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल’ असे या पुरस्काराचे नाव असून हा रशियातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला आहे.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने मला सन्मानित केल्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन याचे आभार मानतो. तसेच हा पुरस्कार मी भारतीयांना समर्पित करतो. हा सन्मान फक्त माझा नाही तर हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. भारत आणि रशिया यांच्यातील शतकानुशतके मैत्रीचा आणि परस्पर विश्वासाचा हा सन्मान आहे. प्रत्येक वेळी नवीन उंची गाठली आहे. यामुळे आपले परस्पर सहकार्य अधिक मजबूत होत आहेत”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Narendra Modi in jharkhand
“झारखंडमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताधारी ‘जेएमएम’वर आरोप
Narendra Modi Wardha tour Union Ministry of Micro and Small Scale Vishwakarma Yojana Programme
आमचे काय ? पंतप्रधानांचा दौरा आणि भाजप नेत्यांना पडला पेच, जिल्हाधिकाऱी म्हणतात हा तर…
Wardha, Narendra Modi, Nitesh Karale master,
वर्धा : सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन् संतप्त मात्र कराळे गुरुजी! काय आहे कारण?
pm narendra modi speaks to putin on his ukraine visit also discusses measures to strengthen ties
युक्रेन भेटीवरून मोदी-पुतिन चर्चा; संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा
US President Joe Biden and Prime Minister Narendra Modi
PM Modi-Biden call: पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांच्या संभाषणात बांगलादेशचा उल्लेख नाही? दोन्ही देशांच्या प्रसिद्धी पत्रकात विसंगती
pm modi talks with joe biden
PM Modi calls Biden: पंतप्रधान मोदींचा बायडेन यांना फोन; युक्रेन दौरा आणि बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेवर चर्चा

हेही वाचा : “युद्धाने प्रश्न सुटणार नाहीत, शांततेसाठी मी…”, रशिया-युक्रेन संघर्षावरून मोदींचा पुतिन यांना सल्ला

दरम्यान, या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी शांतीचा संदेश दिला. ते म्हणाले की, “युद्धाच्या मैदानात अडचणींवरील उपाय सापडत नाहीत. कोणत्याही प्रकारचे प्रश्न सुटत नाहीत. शांततेसाठी चर्चेची खूप जास्त गरज असते. भारत हा नेहमीच शांततेच्या बाजूने उभा राहिला आहे. कारण युद्ध हा अडचणींवरील उपाय नाही. मला शांततेची अपेक्षा आहे. मी शांततेसाठी सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे.”

भारतीयांशी संवाद साधताना मोदी काय म्हणाले?

द्विपक्षीय चर्चेआधी मोदींनी मॉस्को येथील एका कार्यक्रमात तेथील भारतीयांशी संवाद साधला. ते म्हणाले, “मी इथे येताना एकटा आलेलो नाही. मी माझ्याबरोबर काही गोष्टी घेऊन आलोय. मी माझ्याबरोबर भारतातल्या मातीचा गंध घेऊन आलोय, तुमच्यासाठी १४० कोटी भारतीयांचं प्रेम घेऊन आलोय. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर हा माझा परदेशातील भारतीय समुदायाशी पहिलाच संवाद आहे. हा खूप आंनददायी क्षण आहे. आज ९ जुलै असून मला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन आज बरोबर एक महिना झाला आहे. मी आज तुम्हा सर्वांसमोर ठामपणे सांगेन की, माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात मी तिप्पट ताकद लावून काम करेन. आधीपेक्षा तिप्पट वेगाने काम करेन. देशाचा विकास वेगाने करण्याची मी शपथ घेतली आहे.”