कैरो :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इजिप्तमध्ये कैरो येथील अकराव्या शतकातील ऐतिहासिक अल-हकीम मशिदीला भेट दिली. भारतातील दाऊदी बोहरा समाजाच्या मदतीने या मशिदीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इजिप्त भेटीदरम्यान दुसऱ्या दिवशी मोदींनी फातिमिया काळातील या शिया मशिदीला भेट दिली. तेथे त्यांचे स्वागत इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री डॉ. मुस्तफा वझीरी यांनी केले. मोदींना ही मशीद दाखवण्यात आली, तिचे नूतनीकरण सुमारे तीन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. पंतप्रधानांनी मशिदीच्या िभती आणि दरवाजांवर केलेल्या जटिल कोरीव नक्षीकामाची प्रशंसा केली. ही मशीद सन १०१२ मध्ये उभारण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे, की, पंतप्रधान मोदींनी या शिया मशिदीच्या देखभालीत सक्रिय सहभागी असलेल्या बोहरा समुदायाच्या नेत्यांचीही भेट घेतली व भारत-इजिप्तवासीयांतील दृढ संबंध अधोरेखित केले. फातिमिया काळाशी भारतात स्थायिक बोहरा समाजाचा संबंध आहे. इजिप्तमधील भारताचे राजदूत अजित गुप्ते यांनी यापूर्वी सांगितले होते की, बोहरा समाज १९७० पासून मशिदीची देखभाल करत आहे. पंतप्रधानांचे अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये स्थायिक बोहरा समाजाशी दीर्घकाळ स्नेहसंबंध आहेत.
‘ग्रँड मुफ्तीं’शी दहशतवादाबाबत चर्चा
कैरो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तचे इस्लामिक कायदेतज्ज्ञ धर्मगुरू ‘ग्रँड मुफ्ती’ डॉ. शॉकी इब्राहिम अब्देल-करीम अल्लम यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी दोघांदरम्यान इजिप्त-भारत संबंध, तसेच सामाजिक सौहार्द वाढवणे आणि दहशतवाद आणि कट्टरतावादाचा मुकाबला करण्याच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली.
आपल्या पहिल्या इजिप्त दौऱ्यात पंतप्रधानांनी ग्रँड मुफ्तींना सांगितले की, भारत इजिप्तच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अखत्यारितील इस्लामिक कायदेशीर संशोधनासाठी कार्यरत इजिप्शियन सल्लागार संस्था दर-अल-इफ्ता येथे अद्ययावत सुसज्ज माहिती-तंत्रज्ञान केंद्र स्थापन करेल. ग्रँड मुफ्तींनी मोदींच्या सर्वसमावेशक आणि विविधतेला सामावून घेणाऱ्या धोरणाची, त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिली आहे.
यावेळी ग्रँड मुफ्तींनी त्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या भारत दौऱ्यातील स्मृतींना उजाळा दिला. भारतीय आणि इजिप्तवासीयांमधील परस्पर संबंध आणि दृढ सांस्कृतिक संबंधही त्यांनी अधोरेखित केले. मोदींनी या चर्चेनंतर केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की ग्रँड मुफ्तींशी चर्चा करण्याची संधी हा मी माझा बहुमान समजतो. ग्रँड मुफ्तींनी मोदींची प्रशंसा करताना म्हटले, की पंतप्रधान मोदींची भेट घेण्याचा मान मला मिळाला. मोदींच्या रुपात भारतासारख्या मोठय़ा राष्ट्राचे सूज्ञ नेतृत्व प्रतििबबित होते.
‘समृद्ध वारसा, परंपरेचे प्रतीक’
मोदी यांनी या संदर्भात अरबी आणि इंग्रजीत केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की कैरो येथील ऐतिहासिक अल-हकीम मशिदीला भेट देण्याचा मान मिळाला. इजिप्तचा समृद्ध वारसा आणि संस्कृतीचे ते मूर्तिमंत प्रतीक आहे.