दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी सीमेवर तैनात जवानांच्या भेटीसाठी, दिवाळी साजरी करण्यासाठी नौशेरा सेक्टरच्या दौऱ्यावर आहेत. नौशेरामध्ये त्यांनी तैनात असलेल्या जवानांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना आपण नौशेरामध्ये पंतप्रधान म्हणून आलेलो नसून इथल्या जवानांच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आलो असल्याचं मोदी म्हणाले. “प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावी. मलाही वाटतं की मी दिवाळी माझ्या कुटुंबासोबत साजरी करावी. म्हणूनच मी इथे दिवाळी साजरी करतो. कारण तुम्ही माझे कुटुंबीय आहात. मी इथे पंतप्रधान म्हणून आलेलो नाही. मी तुमच्या परिवारातला एक सदस्य म्हणून आलोय. आपल्या कुटुंबियांसोबत आल्यानंतर जसं वाटतं, तसंच तुमच्यासोबत आल्यावर मला वाटतं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

आज देशातला प्रत्येक नागरीक दिवा लावून…

“मी एकटा नाही आलोय. मी माझ्यासोबत १३० कोटी देशवासीयांचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणले आहेत. आज संध्याकाळी भारताचा प्रत्येक नागरीक दिवाळीनिमित्ताने एक दिवा लावून तुमच्या वीरत्वासाठी, तुमच्या शौर्यासाठी, तुमच्या पराक्रमासाठी लावून तुम्हाला अनेकानेक शुभकामना देईल”, असं देखील मोदी यावेळी म्हणाले.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास

“नौशेरानं प्रत्येक कारस्थानाला प्रत्युत्तर दिलं”

दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौशेरा सेक्टरमध्ये तैनात असलेल्या जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं. “नौशेराने प्रत्येक युद्धाचं, प्रत्येक कट-कारस्थानाचं प्रत्युत्तर दिलं आहे. स्वातंत्र्यानंतर शत्रूंनी या भागावर नजर ठेवली आहे. पण मला आनंद आहे की नौशेराच्या वीरांच्या शौर्यासमोर सर्व कारस्थानं अपयशी ठरली आहेत. भारतीय सैन्याची ताकद काय असते, याचा अंदाज शत्रूला सुरुवातीच्या दिवसांमध्येच आला होता”, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

Story img Loader