PM Narendra Modi in The Commissioning Of Three Frontline Naval Ccombatants : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील माझगांव डॉक येथे ‘आयएनएस सूरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांचे आणि ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले. दोन युद्धनौका व एका पाणबुडीचे एकाचवेळी जलावतरण होणे, ही भारताच्या संरक्षण क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. ‘आयएनएस’ सूरत ही सर्वांत मोठी आणि अत्याधुनिक विनाशिका आहे. ही क्षेपणास्त्रवाहू (पी१५बी गाईडेड मिसाईल) प्रकल्पातील चौथी आणि शेवटची विनाशिका आहे. यामध्ये ७५ टक्के तंत्रज्ञान स्वदेशी आहे. ‘आयएनएस निलगिरी’ ही (पी१७ए स्टेल्थ फ्रिगेट) या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पातील पहिली युद्धनौका आहे. ‘आयएनएस वाघशीर’ ही (पी७५ स्कॉर्पियन) प्रकल्पातील सहावी पाणबुडी असून फ्रान्सच्या सहकार्यातून ती बनविण्यात आली आहे. या जलावतरणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवादही साधला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा