PM Narendra Modi Inaugurated First Edition of Soul Leadership Conclave 2025 Highlights: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज दिल्लीत SOUL लीडरशिप कॉनक्लेव्हचं उद्घाटन करण्यात आलं. नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये या कॉनक्लेव्हचं आयोजन करण्यात आलं असून भूतानचे पंतप्रधान शिरिंग तोबगे हेदेखील या कॉनक्लेव्हसाठी उपस्थित आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कॉनक्लेव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणादरम्यान लीडरशिपच्या जोरावर गुजरातनं देशभरात आणि जगभरात आपलं नाव कमावलं आहे, अशी भूमिका मांडली.

Live Updates

PM Narendra Modi Soul Leadership Conclave Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोल लीडरशिप कॉनक्लेव्हमधील भाषण

12:29 (IST) 21 Feb 2025
PM Narendra Modi Inaugurated Soul Leadership Conclave: मला वेळ असता तर दोन दिवस इथेच थांबलो असतो – मोदी

जर माझ्याकडे वेळ असता, तर मी दोन दिवस या कॉनक्लेव्हमध्येच थांबलो असतो. कारण काही काळापूर्वी मी विकसित भारतच्या एका कार्यक्रमात जवळजवळ पूर्ण दिवसभर इथे थांबलो होतो. तेव्हा मला खूप नवीन गोष्टी समजल्या, शिकता आल्या. इथे पहिल्या रांगेत सगळे आपापल्या आयुष्यात यशस्वी झालेले लोक बसले आहेत. यांच्यासोबत बसून गप्पा करण्याचं तुमचं भाग्य आहे. मला ते भाग्य मिळत नाही. कारण हे लोक मला भेटतात तेव्हा काही ना काही काम घेऊन येतात. पण तुम्हाला या कॉनक्लेव्हच्या निमित्ताने यांच्याकडून खूप काही शिकता येईल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

12:27 (IST) 21 Feb 2025
first edition of the SOUL Leadership Conclave: २१व्या शतकात ‘अमृत पिढी’ तयार होत आहे – मोदी

देशात एक नवीन सामाजिक व्यवस्था तयार होत आहे. सध्याची युवा पिढी २१ व्या शतकात जन्माला आली आहे. ही खऱ्या अर्थानं विकसित भारताची पहिली पिढी होणार आहे. ही अमृत पिढी होणार आहे. मला विश्वास आहे की ही सॉल ही नवीन संस्था अशाच प्रकारची अमृत पिढी घडवण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

12:25 (IST) 21 Feb 2025
SOUL Leadership Conclave at Bharat Mandapam in New Delhi: मोदींनी नेतृत्व विकासासाठी तीन गोष्टी केल्या नमूद

मी कुठेतरी वाचलं होतं की जर तुम्ही स्वत:ला विकसित केलं, तर तुम्ही वैयक्तिक यश अनुभवाल, जर तुम्ही एक टीम विकसित केली, तर तुमची संस्था विकसित होईल, जर तुम्ही नेतृत्व विकसित केलं, तर तुमच्या संस्थेचा विलक्षण वेगाने विकास होईल. या तीन गोष्टींवरून आपल्याला आपलं ध्येय कायम लक्षात राहील – पंतप्रधान नरेंद्र मोदी

12:23 (IST) 21 Feb 2025
PM Narendra Modi Speech: स्वातंत्र्य चळवळींपासून वेगवेगळ्या नेतृत्वांचा विकास – मोदी

आपल्या स्वातंत्र्य चळवळीपासून फक्त राजकारणच नाही, इतर क्षेत्रातही नेतृत्व विकसित झालं. आता आपल्याला स्वातंत्र्याच्या त्याच भावनेला पुन्हा जगायचं आहे. त्यापासूनच प्रेरणा घेऊन पुढे वाटचाल करायची आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

12:17 (IST) 21 Feb 2025
PM Narendra Modi Soul Leadership Conclave 2025 Live: मोदींनी नेतृत्वगुण विकासासाठी सांगितला संस्कृत श्लोक

आपल्याकडे शास्त्रात सांगितलंय की यत यत आचरति श्रेष्ठ:.. तत तत एवं इतर: जन:.. म्हणजे श्रेष्ठ मनुष्य जसं आचरण ठेवतो, सामान्य लोक त्याचाच आदर्श ठेवतात. त्यामुळे असं नेतृत्व आवश्यक आहे जे प्रत्येक बाबतीत असं असेल जे भारताच्या राष्ट्रीय धोरणाचं मूर्तिमंत उदाहरण असेल, त्यानुसार आचरण ठेवेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

12:15 (IST) 21 Feb 2025
PM Narendra Modi Soul Leadership Conclave 2025: नवं नेतृत्व ट्रेंड सेट करणारं असावं – मोदी

आपल्याला असं नेतृत्व तयार करावं लागेल जे फक्त ट्रेंड बनवण्यात नाही, तर ट्रेंड सेट करण्यासाठी काम करणारं असेल. येत्या काळात जेव्हा आपण डिप्लोमसीपासून तंत्रज्ञानापर्यंत एका नव्या नेतृत्वाला पुढे आणणार आहोत. या बाबतीत भारताचा प्रभाव कैक पटींनी वाढणार आहे. त्यामुळे एक प्रकारे भारताचं पूर्ण धोरण सक्षम नेतृत्व तयार करण्यावर अवलंबून आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

12:13 (IST) 21 Feb 2025
PM Narendra Modi Soul Leadership Conclave 2025:

येत्या काळात नेतृत्व फक्त सत्तेपर्यंत मर्यादित नसेल. देशातल्या व्यक्तींना या नव्या गरजांसाठी तयार व्हावं लागेल. क्रिटिकल थिंकिंग, रिस्क टेकिंग आणि सोल्युशन ओरिएंटेड नेतृत्व उभं करावं लागेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

12:12 (IST) 21 Feb 2025

आपल्याला असं नेतृत्व आहे जे इंडियन माइंडसेटसोबतच इंटरनॅशनल माइंडसेटने काम करेल. जर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, जागतिक संस्थांमध्ये स्पर्धेत उतरायचं असेल, तर असं नेतृत्व हवं ज्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं आकलन असेल. त्यामुळे सॉलकडून अपेक्षा जास्त आहेत – मोदी

12:10 (IST) 21 Feb 2025

आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेतृत्वाची गरज आहे. सॉलसारख्या संस्था यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. असे लीडर्स आपला पर्यायच नाही, आपली गरजही आहेत. भारताला प्रत्येक क्षेत्रात उत्साहाने काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे – मोदी

12:08 (IST) 21 Feb 2025

मला म्हणायचं हे आहे की सगळ्यात मोठं सामर्थ्य मनुष्यबळ साधनसंपत्तीमध्ये असतं. याला आजच्या भाषेत लीडरशिप किंवा नेतृत्व म्हटलं जातं. २१व्या शतकात तर अशा साधनांची आवश्यकता आहे जे संशोधनाला योग्य दिशा देऊ शकेल, साधनसंपत्तीचं योग्य ठिकाणी वापरू शकेल. प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वाला किती महत्त्व आहे हे आपण पाहात आहोत – मोदी

12:06 (IST) 21 Feb 2025

गुजरातच्या सामान्यांमध्ये सामर्थ्य आहे. ते रडत बसले नाही की आमच्याकडे अमुक नाहीये, तमुक नाहीये. अरे जे असेल ते. गुजरातमध्ये हिऱ्याची एकही खाण नाहीये. पण जगात १० पैकी ९ हिरे असे आहेत, ज्याला कोणत्या ना कोणत्या गुजराती व्यक्तीचा हात लागलेला असतो – मोदी

12:04 (IST) 21 Feb 2025

कोणताही देश प्रगती करतो तेव्हा नैसर्गिक साधनसंपत्तीचं महत्त्व आहेच. पण त्यापेक्षाही मनुष्यबळाचंही मोठं महत्त्व आहे. मला आठवतंय की जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात स्वतंत्र होण्याचं आंदोलन चालू होतं, तेव्हा आम्ही फार लहान होतो, पण तेव्हा चर्चा होती की गुजरात वेगळा होऊन काय करेल? गुजरातकडे नैसर्गिक साधन संपत्ती नाहीये, कुठली खाण नाही, कुठला कोळसा नाही.. काहीच नाही. गुजरात काय करणार? पाणीही नाही. वाळवंट आहे. आणि पलीकडे पाकिस्तान आहे. जास्तीत जास्त या गुजराती लोकांकडे मीठ आहे. अजून काय आहे? पण नेतृत्वाची ताकद पाहा, आज तोच गुजरात सर्वकाही आहे – मोदी

12:02 (IST) 21 Feb 2025

स्वामी विवेकानंदांचा हाच मंत्र घेऊन तुम्हा सर्वांना पुढे वाटचाल करायची आहे. आज प्रत्येक भारतीय २१व्या शतकातील विकसित भारतासाठी दिवस-रात्र काम करतोय. अशा स्थितीत १४० कोटींच्या देशातही प्रत्येक क्षेत्रात आपल्याला उत्तमोत्तम नेतृत्वाची गरज आहे. फक्त राजकीय नेतृत्व नाही – मोदी

12:01 (IST) 21 Feb 2025

सोल आज पहिलं पाऊल ठेवत आहे, अशावेळी तुमची दिशा काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायला हवं. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की मला १०० तरुण उत्साही भारतीय द्या, मी देश बदलून दाखवतो. स्वामी विवेकानंद यांना भारताला गुलामगिरीतून बाहेर काढून बदलायचं होतं. त्यांचा विश्वास होता की जर त्यांच्याकडे १०० नेते असतील, तर ते भारताला स्वातंत्र्यच नाही तर जगातला पहिला देश बनवू शकतील – मोदी

11:58 (IST) 21 Feb 2025

द स्कूल ऑफ अल्टिमेट लीडर्स अर्थात SOULची स्थापना विकसित भारताच्या प्रवासात एक खूप महत्त्वपूर्ण आणि मोठं पाऊल आहे. या संस्थेच्या नावातच SOUL आहे असं नाहीये, ही संस्था भारताच्या सामाजिक आयुष्याचा आत्मा बनणार आहे. जर या Soul कडे त्या भावनेतून पाहिलं तर ही आत्म्याची अनुभूती करते – मोदी

11:56 (IST) 21 Feb 2025

कोणतंही यशोशिखर प्राप्त करायचं असेल, तर प्रारंभ जनतेपासूनच सुरू होतो. प्रत्येक क्षेत्रात उत्तम नागरिकांचा घडवणं आवश्यक आहे. काळाची ती गरज आहे – मोदी

11:55 (IST) 21 Feb 2025

काही कार्यक्रम हृदयाच्या खूप जवळ असतात. हा कार्यक्रमही असाच आहे. राष्ट्रउभारणीसाठी चांगल्या नागरिकांना घडवणं गरजेचं आहे. व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माण आवश्यक आहे – मोदी

11:51 (IST) 21 Feb 2025

पूर्वी लोकांना वाटायचं गुजरात स्वतंत्र होऊन काय करून घेईल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकांना पूर्वी वाटायचं की गुजरात स्वतंत्र होऊन काय करेल? गुजरातकडे नैसर्गिक साधन संपत्ती नाहीये, कुठली खाण नाही, कुठला कोळसा नाही.. काहीच नाही. गुजरात काय करणार? पाणीही नाही. वाळवंट आहे. आणि पलीकडे पाकिस्तान आहे. जास्तीत जास्त या गुजराती लोकांकडे मीठ आहे. अजून काय आहे? पण नेतृत्वाची ताकद पाहा, आज तोच गुजरात सर्वकाही आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>

मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी केव्हा होणार? (संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दिल्लीत भाषण

PM Narendra Modi Soul Leadership Conclave Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोल लीडरशिप कॉनक्लेव्हमधील भाषण