माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे या स्मारकात कलाम यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. डीआरडीओने या स्मारकाचे बांधकाम केले आहे. स्मारकाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पंतप्रधान मोदींनी यावेळी कलाम यांच्या कुटुंबियांशीही संवाद साधला.

स्मारकाच्या उद्घाटनासाठी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरम येथे पोहोचले. स्मारक परिसरात त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कलाम यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर त्यांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मोदींनी ‘कलाम संदेश वाहिनी’ या प्रदर्शनीय बसला हिरवा झेंडा दाखवला. ही बस देशाच्या विविध राज्यांतून जाणार आहे. १५ ऑक्टोबरला ती राष्ट्रपती भवनात पोहोचणार आहे. स्मारकाचं उद्घाटन केल्यानंतर मोदींनी सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ‘नीली क्रांति’ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना नौका देण्यासंदर्भातील मंजुरी पत्रेही वितरीत करण्यात आली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी अयोध्या ते रामेश्वरम एक्स्प्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला.

Story img Loader