मुंबई : देशभरातील ८५ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या ६ हजार रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि देशभरातील १० वंदे भारत एक्स्प्रेस व इतर रेल्वे सेवांना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला.

देशभरातील ५० प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रे, २२२ रेल्वे गुड्स शेड, ५१ गती शक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनल, दोन हजार ६४६ स्थानकांचे डिजिटीकरण, ३५ रेल्वे कार्यशाळा, लोको शेड, दुरूस्ती मार्गिका, कोचिंग आगार, ५० किमी रेल्वेचे दुहेरीकरण, १,०४५ किमीच्या ८० रेल्वे मार्गिकाचे स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग, ३५ रेल्वे कोट रेस्टॉरंट, दीड हजारांहून अधिक एक स्थानक – एक उत्पादन स्टॉल, ९७५ सौरऊर्जेवर चालणारी स्थानके व इमारती, २,१३५ किमी रेल्वे मार्गिकेचे विद्याुतीकरण, ४०१ किमी न्यू खुर्जा- सनेहवाल ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर विभाग, २४४ किमी न्यू मकरपुरा – न्यू घोलवड वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर विभाग, अहमदाबाद येथे ऑपरेशन कंट्रोल सेंटर, फलटण – बारामती नवीन रेल्वे मार्गिका आणि ९ विद्याुत ट्रॅक्शन प्रणाली अद्यातन आदींची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन करण्यात आले.

dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Rajewadi Station , Purandar Airport ,
पुणे : राजेवाडी स्थानकापासून पुरंदर विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका, एकात्मिक वाहतूक आराखड्यात प्रकल्प प्रस्तावित
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
pune metro new routes
Pune Metro: पुण्यातील वाहतूक खोळंब्यावर १,२६,४८९ कोटींचा तोडगा; जिल्हा नियोजन समितीत CMP सादर!
Shilpata road remain closed five days February reconstruction work Nilaje railway flyover
अत्यंत वर्दळीचा शिळफाटा रस्ता फेब्रुवारीत पाच दिवस बंद रहाणार, वाचा सविस्तर…
train cancellations on western railway due to mega block
वाणगाव ते डहाणू रोडदरम्यान ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार

हेही वाचा >>> निवडणूक रोखेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिल अध्यक्षांचे पत्र; मध्यस्थीसाठी राष्ट्रपतींना गळ

अहमदाबाद – जामनगर ओखापर्यंत, अजमेर-दिल्ली सराय रोहिल्ला चंदीगडपर्यंत, गोरखपूर – लखनऊ प्रयागराजपर्यंत तिरुवअनंतपुरम – कासरगोड मंगळूरपर्यंत वाढवण्यात आली.

वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर – चेन्नई, लखनौ – देहराडून, कलबुरगी – बंगळुरू, रांची – वाराणसी, हजरत निजामुद्दीन – खजुराहो, सिकंदराबाद – विशाखापट्टणम, न्यू जलपाईगुडी – पाटणा, पाटणा- लखनौ, अहमदाबाद – मुंबई सेंट्रल आणि भुवनेश्वर – विशाखापट्टणम वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

राज्यातील ५०६ प्रकल्पांची पायाभरणी

महाराष्ट्रातील १५० एक स्थानक – एक उत्पादन स्टॉल, १७० इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली, १३० सौरऊर्जा पॅनेल, १८ नवीन मार्गिका, दुहेरीकरण, १२ गुड्स शेड, ७ स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा, ४ गती शक्ती टर्मिनल आणि ३ विद्याुतीकरण प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले. तसेच लातूर येथील रेल्वे डबा कारखान्याचे लोकार्पण, बडनेरा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळा आणि पुणे येथील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो याचे लोकार्पण केले जाणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, पिंपरी, सोलापूर आणि नागभीड (चंद्रपूर जिल्हा) येथे पाच जन औषधी केंद्रांचे उद्घाटन, नाशिक रोड, अकोला, अंधेरी आणि बोरिवली येथे ४ रेल कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले.

Story img Loader