पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यास वेळ लागणार नाही-संरक्षणमंत्री | pm narendra modi india us statement Pakistan terrorism rajnath singh zws 70

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जम्मू : पाकव्याप्त काश्मीर परत घेणे भारतासाठी फारसे कठीण काम नाही, त्यामुळे पाकिस्तानने आधी आपल्या देशातील प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारत आणि अमेरिकेने जारी केलेल्या संयुक्त निवेदनावर पाकिस्तानने टीका केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ यांनी हा इशारा दिला.काश्मीरचा बराचसा भाग पाकिस्तानच्या ताब्यात असून तेथील लोकांना दिसते आहे की, भारतीय हद्दीत असलेल्या लोकांना शांततेत जीवन कंठता येत आहे. याउलट पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भागातील लोकांवर पाकिस्तान सरकार अत्याचार करीत आहे, असे त्यांनी बजावले.   

लक्ष्यभेदी हल्ल्याचा दाखला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक व्यासपीठावर भारताची प्रतिष्ठा आणि उंची वाढली आहे. भारत हा अधिकाधिक ताकदवान होत असून आवश्यकता भासल्यास तो सीमेच्या अलीकडेही मारू शकतो आणि सीमेपलीकडे जाऊनही मारू शकतो, असे संरक्षणमंत्री म्हणाले. मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देशाने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली असल्याचे सांगताना, त्यांनी २०१६ साली सीमेपलीकडे केलेला लक्ष्यभेद आणि २०१९ सालचा बालाकोट हवाई हल्ला यांची उदाहरणे दिली. ईशान्य भारताच्या अनेक भागांतून सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा (आफस्पा) हटवण्यात आला असून, जम्मू व काश्मीरमध्ये ‘कायमस्वरूपी शांतता’ स्थापन झाल्यानंतर तेथूनही तो हटवला जाईल असे सिंह यांनी सांगितले.