तीन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इस्रायलमध्ये शाही स्वागत करण्यात आले. ‘आपका स्वागत है मेरे दोस्त’ असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मोदींचे स्वागत केले. आमचे भारतावर प्रेम असून तुमची संस्कृती, इतिहास, लोकशाही आणि विकासासाठी असलेली कटीबद्धता याचा आम्हाला आदर आहे असे नेत्यानाहू यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित इस्रायल दौऱ्याला मंगळवारी सुरुवात झाली. तेल अवीव विमानतळावर मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू शिष्टाचार सोडून स्वतः मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर आले होते. मोदींची गळाभेट घेतल्यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी पत्रकारांशी संवाद साधला. नेत्यानाहू यांनी पुन्हा एकदा मोदींचा उल्लेख ‘माझा मित्र’ असा केला. भारताच्या पंतप्रधानांचे स्वागत करताना नेत्यानाहू हिंदीत म्हणाले, आपका स्वागत है मेरे दोस्त. भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा आदर असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देश एकत्र येऊन चांगल काम करु शकतील असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
नेत्यानाहू यांच्यानंतर मोदींनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या. इस्रायलचा दौरा माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मोदींनी सांगितले. आर्थिक संबंधांसोबतच संरक्षण क्षेत्रातही दोन्ही देशांचे संबंध आहे. दहशतवादाविरोधात दोन्ही देश एकत्र असल्याचे मोदींनी नमूद केले.
दरम्यान, इस्रायल दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मोदींनी स्थानिक वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्या शांततामय सहअस्तित्वावर भारताचा विश्वास आहे आणि दोन्ही देशांनी परस्परांमधील वाद सामोपचाराने मिटवावेत असे मोदींनी म्हटले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन या देशांनी चांगले शेजारी म्हणून राहावे आणि वादाचे मुद्दे वाटाघाटीतून सोडवावेत असे मोदींनी स्पष्ट केले.
#WATCH Israeli PM Benjamin Netanyahu says, 'Aapka swagat hai mere dost' welcoming Prime Minister Narendra Modi to Israel pic.twitter.com/QjtsoCek2R
— ANI (@ANI_news) July 4, 2017
A progressive partnership in all these areas would shape the scope of my conversation with my friend PM Benjamin Netanyahu: #ModiInIsrael pic.twitter.com/MkIdJHU13p
— ANI (@ANI_news) July 4, 2017