पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच राज्यांमधील निवडणुकांमधला पराभव दिसू लागला आहे. त्याचमुळे ते माझ्याविरोधात तिरस्कार पसरवत आहेत. मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान यांना समजले की ते माझ्याविरोधात हरणार आहेत. मात्र ते माझा तिरस्कार करत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मात्र पराभवाची पक्की खात्री पटली आहे त्यामुळे ते माझ्याविरोधात तिरस्कार पसरवत आहेत असा आरोप आता राहुल गांधी यांनी दमोह या ठिकाणी झालेल्या सभेत केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या स्वयंपाक घरांमध्ये पोळ्या-भाकरी तयार करण्यासाठी तवा असतो. त्या तव्याला दहा वर्षे झाली की तो खराब होतो. त्यामुळे तो फेकावा लागतो आणि नवा तवा आणावा लागतो. शिवराज सिंह चौहान सरकारला असेच खराब झालेल्या तव्यासारखे सत्तेबाहेर फेका आणि आम्हाला सत्ता द्या असेही आवाहन राहुल गांधी यांनी केले. या सरकारने मोफत गॅस देण्याचे आश्वासन दिले होते. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते मात्र आपले एकही आश्वासन या सरकारने पाळलेले नाही त्यामुळे यांना पुन्हा निवडून देण्याचा प्रश्नच येत नाही असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.

शिवराज सिंह सरकारने मंदसौरमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला. हे शेतकऱ्यांवर गोळ्या चालवणारे सरकार आहे, जर आम्हाला सत्ता मिळाली तर मी वचन देतो की मध्यप्रदेशातल्या शेतकऱ्यांचे कर्ज सत्तेवर आल्यानंतरच्या दहा दिवसात माफ केले जाईल असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. शनिवारी दुपारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत राहुल गांधी यांचे मामा क्वात्रोची आणि अँडरसन असल्याचा टोला लगावला होता. एवढेच नाही तर देशाचे नुकसान करणाऱ्या या दोघांना राहुल गांधींच्या वडिलांनी सगळ्यांपासून लपत छपत अमेरिकेला का पोहचवले हे देखील जनतेला सांगा असा खोचक सल्लाही दिला होता. याच टीकेला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याविरोधात फक्त तिरस्कार पसरवत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांना पराभव दिसू लागल्याने आता ते असे वागत आहेत असाही टोला राहुल गांधींनी लगावला.