पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा अयोध्येत दिवाळी साजरी करण्याची शक्यता आहे. रविवारी (२३ ऑक्टोबर) दीपोत्सव सोहळ्यासाठी ते अयोध्येत दाखल होतील. तसेच या दौऱ्यादरम्यान ते राम मंदिरात पूजा करणार असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, उद्या (बुधवारी) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दीपोत्सव सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अयोध्येला पोहचतील.

हेही वाचा – Diwali 2022: उटण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? त्वचेच्या अनेक समस्यांवर ठरू शकते रामबाण उपाय

सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, रविवारी राम मंदिरात पूजा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राची पाहणी करतील. तसेच शरयू नदीकाठावर होणाऱ्या महाआरतीतही ते सहभागी होतील. या बरोबरच ते रामलिलामध्ये काम करणाऱ्या कलाकारांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा – आता गुगलवर दिवाळी सर्च करताच दिसेल सुंदर अॅनिमेशन; तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येईल तेजस्वी प्रकाश

अयोध्येत रविवारपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय दीपोत्सव सोहळ्यादरम्यान रशिया, मलेशिया, श्रीलंका आणि फिजी येथील कलाकार रामलीलाचे सादरीकरण करणार आहेत. तसेच यंदा दीपोत्सवानिमित्त १७ लाख दिवे लावण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.

Story img Loader