Budget Session : अर्थसंकल्पीय संसद अधिवेशन सुरू असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर सत्ताधारी आणि विरोधकांमधील विविध खासदारांची भाषणे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ फेब्रुवारी) लोकसभेत या चर्चेला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांचा समाचार घेतला. तसेच सरकारच्या धोरणांबाबत भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates
19:31 (IST) 7 Feb 2022
राजकारण कोणत्या थराला जाऊन करावं याबाबतीत पंतप्रधान चुकले : बाळासाहेब थोरात

करोना संकट काळात मजुरांची काळजी घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची पण होती. अनेक महिने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामगारांना सांभाळलं आणि नंतर त्यांनी गावाला जायचं असा आग्रह धरला. तेव्हा त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे होती, पण केंद्र सरकारने जबाबदारी नाकारली. तेव्हा शेवटी महाविकास आघाडीने रेल्वेच्या तिकिटांची व्यवस्था केली. ती जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारायला हवी होती, ती आम्ही घेतली. मजुरांची व्यवस्था केली. खरं म्हणजे याचं कौतुक होणं आवश्यक होतं. पंतप्रधान मोदींनी ते केलं नाही. मात्र, जो मजूर बिहार-उत्तर भारतातला आहे तो आमचे महाविकास आघाडीचे कौतुक करतो की त्यांनी आम्हाला चांगलं सांभाळलं.

पंतप्रधानांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. ते त्यांच्या पदाला शोभणारे नाही. करोनाचे संकट आले तेव्हा लाखो मजूर परराज्यातले होते. आम्ही त्यांची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली. जेव्हा मजुर गावाकडे जायचं असा आग्रह करू लागले, तेव्हा त्यांची पाठवणूक सुद्धा अत्यंत व्यवस्थित केली. तिकिटे काढली, जेवणाचा डबा दिला. याचे कौतुक पंतप्रधान यांनी केलं असतं, तर आनंद झाला असता. राजकारण कोणत्या थराला जाऊन करावं याबाबतीत मात्र पंतप्रधान चुकले आहेत.

– बाळासाहेब थोरात (महसूल मंत्री, महाराष्ट्र)

19:22 (IST) 7 Feb 2022
CDS रावत यांच्यासाठी तामिळ बंधु-भगिनी लाखोंच्या संख्येने तासंतास उभे राहिले : मोदी

जेव्हा CDS जनरल रावत यांचा हेलिकॉप्टरचा दक्षिण भारतात अपघात होऊन मृत्यू झाला आणि त्यांचा मृतदेह तामिलनाडूतून विमानतळावर नेला जात होता तेव्हा रस्त्यात अनेक तामिळ बंधुभगिनी लाखोंच्या संख्येने तासंतास उभे होते.

– मोदी

19:10 (IST) 7 Feb 2022
स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही असते : मोदी

आज पुन्हा सांगतो, स्वतंत्र हिंदुस्थान आहे, त्याचे वर्ष साजरे करतो, पण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही असते. जबाबदारी फक्त सरकारची नाही.

– मोदी

19:09 (IST) 7 Feb 2022
काँग्रेस ‘टुकडे टुकडे गँग’ची लीडर बनलीय : मोदी

काँग्रेस कायमच द्वेष करत आली आहे. विभाजनवादी मानसिकता काँग्रेसच्या DNA मध्ये घुसली आहे. इंग्रज निघून गेले, 'तोडा आणि राज्य करा' या नीतीला काँग्रेसने आपले चरित्र बनवले आहे. काँग्रेस तुकडे तुकडे गँगची लीडर बनली आहे.

– मोदी

19:05 (IST) 7 Feb 2022
संरक्षण व्यवहारात मोठ्या शक्ती चांगल्या चांगल्यांना खरेदी करत होत्या : मोदी

मला माहिती आहे की संरक्षण व्यवहारात किती मोठ्या शक्ती चांगल्या चांगल्यांना खरेदी करत होत्या. अशा शक्तींनी मोदीला आव्हान दिलंय. त्यामुळे त्यांचा मोदीवर राग असणं स्वाभाविक आहे. हा राग वेळोवेळी प्रगट होत राहतो.

– मोदी

19:02 (IST) 7 Feb 2022
काही लोकांना देशातील तरुणांना भीती दाखवण्यात आनंद वाटतो : मोदी

काही लोकांना देशातील तरुणांना, देशातील उद्योजकांना, देशात संपत्तीचं निर्मिती करणाऱ्यांना भीती दाखवत घाबरवण्यात आनंद वाटतो. मात्र, देशातील तरूण त्यांचं म्हणणं ऐकत नाही. त्यामुळेच देश पुढे जात आहे.

– मोदी

18:57 (IST) 7 Feb 2022
आम्ही गरीब कामगारांसाठी २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला : मोदी

आम्ही गरीब कामगारांसाठी २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनांतर्गत हजारो लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले.

– मोदी

18:52 (IST) 7 Feb 2022
नेहरूंना महागाईवर लाल किल्ल्यावरून भाषण करताना हात वर करावे लागले होते : मोदी

कधी कधी कोरियातील लढाई आम्हाला प्रभावित करते. वस्तूंच्या किमती वाढतात आणि नियंत्रणाच्या बाहेर पण जाते. देशाचे पहिले पंतप्रधान महागाईवर हात वर करत आहेत. अमेरिकेत काही झालं, तर वस्तूंच्या किमतीवर प्रभाव पडतो. बघा तेव्हा नेहरू यांना लाल किल्ल्यावरून भाषण करताना हात वर करावे लागले होते. मात्र, आज तुम्ही असता, तर कोरोनावर सगळं ढकलून मोकळं झाले असता.

– मोदी

18:49 (IST) 7 Feb 2022
आज नेहरूच नेहरू असणार, तुमचे नेताही म्हणतील मजा आली : मोदी

तुम्ही जागतिक परिस्थितीचे कारण सांगत जवाबदारी झटकत होता. पंडित नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून काय महागाईवर काय म्हटलं होतं ते मी सांगतो. मी तुमच्यामुळे नेहरू यांचे नाव घेत नव्हतो, मात्र आज नेहरूच नेहरू असणार आहेत. तुमचे नेताही म्हणतील मजा आली.

– मोदी

18:46 (IST) 7 Feb 2022
काँग्रेस काळात १० टक्क्यांपेक्षा अधिक महागाईचा दर, २०१४ नंतर ५ टक्के : मोदी

आम्ही महागाई वाढणार नाही याचा प्रयत्न केला. जीवनावश्यक गोष्टींच्या किमती गगनाला भिडणार नाही याची काळजी घेतली. काँग्रेस काळात १० टक्क्यांपेक्षा अधिक महागाईचा दर होता. मात्र २०१४ नंतर महागाईच दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. यावर्षी करोना असून सुद्धा महागाईचा दर हा ५.२ टक्के राहिला आहे.

– मोदी

18:42 (IST) 7 Feb 2022
काँग्रेसच्या काळात शेवटच्या ५ वर्षात महागाईचा आकडा दोन अंकापर्यंत पोहचला : मोदी

काँग्रेसच्या काळात शेवटच्या ५ वर्षात महागाईचा आकडा दोन अंकापर्यंत पोहचला होता. काँग्रेस स्वतःच मानू लागली होती की महागाईवर आता नियंत्रण राहिलेले नाही. १५ रुपयांची पाणी बॉटल, २० रुपयांचे आईस्क्रीम घेताना महागाई वाटत नाही, पण गहू १ रुपयाने वाढला तर महागाई वाटत होती असं तेव्हाचे अर्थमंत्री चिदंबरम यांनी म्हटलं होतं.

– मोदी

18:34 (IST) 7 Feb 2022
काँग्रेस एक क्षण मोदी शिवाय राहू शकत नाही : मोदी

तुम्ही फाईलमध्ये अडकून राहिलात, आम्ही लोकांचे जीवन बनवलं. पायाभूत सुविधांची कामे देशात जोरात सुरू आहेत. यामुळे रोजगार निर्माण होत आहे. काँग्रेस एक क्षण मोदी शिवाय राहू शकत नाही. जे इतिहासातून काही शिकत नाही ते इतिहासध्ये हरवून जातात.

– मोदी

18:30 (IST) 7 Feb 2022
करोना काळात देशात कोणाला भुकेने मरु दिलं नाही : मोदी

जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्था आहे. १०० वर्षापूर्वी महामारीची माहिती अशी होती की आजारापेक्षा भुकेने अधिक लोकं मेली. करोना काळात देशात कोणाला भुकेने मरु दिलं नाही. ८० कोटी जनतेला मोफत राशन उपलब्ध करुन दिलं.

– मोदी

18:28 (IST) 7 Feb 2022
काँग्रेसच्या वागण्यावरून त्यांना पुढील १०० वर्षे तरी सत्तेत यायचं दिसत नाही : मोदी

काँग्रेसच्या वागण्याने मीच नाही पूर्ण देश अचंबित आहे. काँग्रेसची लोकं ज्या पद्धतीने वागत आहे, बोलत आहे त्यावरून त्यांनी ठरवलेलं दिसतं की पुढील १०० वर्षे तरी सत्तेत यायचं नाही.

– मोदी

18:24 (IST) 7 Feb 2022
जगातील लोकांकडून भारताची बदनामी करणाऱ्या अशा गोष्टी बोलवून घेतल्या : मोदी

कोरोना काळात तयार झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पहिल्या दिवसापासून जे जे केलं त्याविषयी काय काय बोललं गेलं याला संसद साक्षीदार आहे. जगातील लोकांकडून भारताची बदनामी करणाऱ्या अशा गोष्टी बोलवून घेतल्या.

– मोदी

18:18 (IST) 7 Feb 2022
देशातील अनेक राज्यांनी काँग्रेसला मागील मोठ्या काळापासून नाकारलं : मोदी
  • नागालँडच्या लोकांनी सर्वात शेवटी १९९८ मध्ये काँग्रेसला मतदान केलं होतं, त्याला आता जवळपास २४ वर्षे झाले
  • ओडिशाने १९९५ मध्ये काँग्रेसला मतदान केलं, केवळ २७ वर्षे झालेत तिथं काँग्रेसला प्रवेश मिळाला नाही
  • गोव्यात १९९४ मध्ये पूर्ण बहुमतासह जिंकले होते, २८ वर्षांपासून गोव्यात तुम्हाला स्वीकारलं गेलं नाही
  • मागील वेळी १९८८ मध्ये त्रिपुरात जनतेने काँग्रेसला मत दिलं, त्याला ३४ वर्षे झालेत
  • उत्तर प्रदेश, गुजरात, बिहारने शेवटी १९८५ मध्ये काँग्रेसला मतदान केलं होतं, त्याला जवळपास ३७ वर्षे झाले
  • पश्चिम बंगालमधील लोकांनी काँग्रेसला जवळपास ५० वर्षांपूर्वी १९७२ मध्ये निवडलं होतं
  • – मोदी

    18:11 (IST) 7 Feb 2022
    विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या भाषणावर आक्षेप

    विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या भाषणावर आक्षेप, काँग्रेसवर टीकेनंतर रोजगारावर बोलण्याची मागणी, पंतप्रधानांकडून चौधरी यांच्यावर बालिशपणाचा आरोप

    18:04 (IST) 7 Feb 2022
    लॉकडाउनमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कामगारांना तिकीट काढून घरी पाठवलं : मोदी

    लॉकडाउनमध्ये काँग्रेसच्या लोकांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभे राहून मुंबईतील कामगारांना आपआपल्या घरी जाण्यासाठी तिकीट काढून दिले. लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं.

    – मोदी

    18:01 (IST) 7 Feb 2022
    मानव जातीवर संकट आलं असतांना हे कसं वागणं आहे : मोदी

    उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये करोना नव्हता तिथे करोना अधिक पसरला गेला. मानव जातीवर संकट आलं असतांना हे कसं वागणं आहे. काँग्रेसच्या वागण्याने मीच नाही पूर्ण देश अचंबित आहे.

    – मोदी

    17:54 (IST) 7 Feb 2022
    करोना काळात काँग्रेसने मर्यादा गाठली होती : मोदी

    पहिल्या लॉकडाऊन काळात देश करोना नियमांचे पालन करत होता, साऱ्या जगात असा संदेश दिला जात होता, तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकांना जाण्यासाठी सांगितलं गेलं, तिकीट काढून दिलं गेलं. महाराष्ट्रातील ओझं कमी करा आणि जिथे कमी आहे उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जा, तुम्ही आमच्या श्रमिक लोकांना मोठ्या त्रासात ढकलून दिलं. अशा वेळी दिल्लीत अशी सरकार आहे त्यांनी झोपडपट्टीत फिरून सांगितलं धोका आहे, आपल्या घरी जा – मोदी

    17:47 (IST) 7 Feb 2022
    पंतप्रधान मोदींकडून शेरोशायरीच्या रुपात काँग्रेसवर हल्लाबोल

    वो जो दिन को रात कहे तो तुरंत मान जाये,

    नही मानो गे वो तो दिन में नकाब ओढ लेंगे,

    जरुरत हुई तो हकीकत को थोडा बहोत मोड लेंगे

    – पंतप्रधान मोदी

    17:44 (IST) 7 Feb 2022
    काँग्रेसला देशात अनेक राज्यांमध्ये जनतेने नाकारले : पंतप्रधान मोदी

    “नागालँडमधील लोकांनी १९९८ ला काँग्रेसला मत दिले होते, ओरिसात १९९५ ला शेवटचे बहुमत दिले होते. त्रिपुरात १९८८ मध्ये काँग्रेसला बहुमत दिले होते. पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे बहुमत मिळाले नाही, आंध्र प्रदेशमध्ये १९६२ नंतर सत्ता मिळाली नाही. काँग्रेस तेलंगणा राज्य निर्मितीचं श्रेय घेते, पण त्यानंतर तेथील लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही. झारखंडची निर्मिती होऊन २० वर्षे झाली अजून बहुमत मिळाले नाही,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

    17:40 (IST) 7 Feb 2022
    कोरोना काळानंतर जग एका नव्या युगाच्या दिशेने जात आहे : पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान मोदी म्हणाले, “कोरोना काळानंतर जग एका नव्या युगाच्या दिशेने जात आहे. जग नव्या व्यवस्थांकडे वेगाने पुढे जात आहे. हा एक turning point आहे. आपल्याला एक भारतासाठी ही संधी गमवायची नाही.”

    17:33 (IST) 7 Feb 2022
    लता मंगेशकरांनी त्यांच्या आवाजाने सर्वांना मोहित केलं : पंतप्रधान मोदी

    माझे म्हणणे सुरु करण्यापूर्वी कालच्या घटनेबद्द्ल दोन शब्द बोलणार आहे. लता मंगेशकर यांना आपण गमावलं. किती दीर्घ काळ यांच्या आवाजाने आपल्या सर्वांना मोहित केले, प्रभावित केले, भावनांनी भरुन टाकले. त्यांच्यामुळे सांस्कृतिक ठेवा आणि एकता हे अधिक मजबूत केलं : पंतप्रधान मोदी