नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला ५० टक्के मते मिळवून देण्याचे लक्ष्य ठेवा, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय बैठकीत दिला आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याची गरज असून बुथ स्तरावर अधिक सक्रिय होण्याची सूचनाही मोदींनी या बैठकीत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील भाजप मुख्यालयाच्या विस्तारित इमारतीमध्ये दोन दिवसांच्या बैठकीची शनिवारी सांगता झाली. दुसऱ्या दिवशी सात तास झालेल्या विचारमंथनामध्ये अमित शहा हेदेखील सहभागी झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुमारे ४० टक्के मते मिळवून ३०३ जागा जिंकल्या होत्या. आता मतांच्या टक्केवारीत १० टक्क्यांची वाढ आणि लोकसभेच्या ४०० जागा असे ध्येय ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा >>> दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषधे! सीबीआय चौकशीची शिफारस

बुथ व्यवस्थापनावर भर

भाजपचे राष्ट्रीय सचिव-महासचिव, उपाध्यक्ष तसेच, सर्व प्रदेशाध्यक्ष, प्रभारी, विविध मोर्चाचे प्रमुख आदी सुमारे अडीचशे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. अमित शहा यांनी बुथ व्यवस्थापनावर भर देण्याची सूचना केल्याचे समजते.

मतदान परिषदांचे आयोजन?

महिला, युवा, ओबीसी, दलित, आदिवासी आणि गरीब यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी देशभर मतदार परिषदा आयोजित केल्या जाणार असून त्यामध्ये मोदी सहभागी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राम मंदिराचा मुद्दाही..

अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार असून रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा सोहळा गावा-गावांमध्ये दाखवण्यासाठी मोठे स्क्रीन उभे करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

यूपीएचे घोटाळे तरुणांपर्यंत पोहोचवा!    

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नव्या मतदारांना आकर्षित करताना २००४-१४ या काळातील यूपीए सरकारच्या भ्रष्टाचार व घोटाळय़ांची माहिती देऊन गेल्या दहा वर्षांतील भाजप सरकारच्या कारभाराशी तुलना करणे. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारच्या सुप्रशासनाचे महत्त्व वा पिढीला पटवून देणे. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे, या योजनांचे लाभ लाभार्थीपर्यंत पोहोचल्याची शहानिशा करणे आदी सूचना मोदी व शहांनी पदाधिकाऱ्यांना केल्याचे समजते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi mantra to national office bearers in meeting at bjp headquarters in delhi zws
Show comments