Lok Sabha Session Updates: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या अधिवेशनात जोरदार आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. अनेक मुद्द्यांवरून विरोधक नव्या सरकारला घेरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांवर तोंडसुऱ घेतलं आहे. अधिवेशनात विरोधकांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा असल्याचं सांगतानाच मोदींनी यावेळी १८ या आकड्याचं भारताच्या दृष्टीने फार महत्त्व असल्याचं नमूद केलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“देशाच्या जनतेनं आम्हाला तिसऱ्यांदा संधी दिली आहे. हा एक महान विजय आहे. त्यामुळे आमची जबाबदारीही तीन पट वाढते. मी देशवासीयांना विश्वास देऊ इच्छितो की आमच्या तिसऱ्या कार्यकाळात आम्ही आधीपेक्षा तीन पट जास्त मेहनत करू”, असं आश्वासन मोदींनी यावेळी दिलं.

pm narendra modi interacted online with around one lakh booth chiefs
मतदारांशी प्रेमाने संवाद साधा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील बूथप्रमुखांना अनेक सूचना
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
sharad pawar eknath shinde ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…
PM Narendra Modi On Congress
PM Narendra Modi : “काँग्रेसने गरिबी हटावचा खोटा नारा दिला, पण आता…”, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024 : राज्यातल्या निवडणुका कोणत्या मुद्यांभोवती फिरत आहेत?
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : ‘महायुतीला किती जागा मिळतील?’ एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही…”
Supriya Sule, Devendra Fadnavis,
दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता; सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल
narendra modi akola public rally
मोदींच्या सभेसाठी अकोल्यात जय्यत तयारी; काय बोलणार याकडे लक्ष?

“सर्व खासदारांकडून देशाला बऱ्याच अपेक्षा आहेत. मी खासदारांना आग्रह करेन की लोकसेवेसाठी आपण या संधीचा उपयोग करूयात. आपण लोकसेवेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करायला हवेत”, असंही ते म्हणाले.

१८वी लोकसभा, १८ आकड्याचं महत्व!

दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १८व्या लोकसभेसंदर्भात भाष्य केलं. १८वी लोकसभा विविध संकल्पांनी युक्त असावी, असं म्हणतानाच त्यांनी १८ आकड्याचं महत्त्व सांगितलं. “संसदीय लोकशाहीत आजचा दिवस गौरवशाली आहे. हा वैभवाचा दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या स्वत:च्या नव्या संसद भवनात हा शपथविधी होत आहे. आत्तापर्यंत ही प्रक्रिया जुन्या संसद भवनात होत होती. आजच्या या महत्त्वपूर्ण दिवशी मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचं मनापासून स्वागत करतो. सर्वांचं अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो”, असं ते म्हणाले.

“पुन्हा कधी कुणी अशी हिंमत…”, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी आणीबाणीचा केला उल्लेख; विरोधकांवर घेतलं तोंडसुख!

“१८व्या लोकसभेत तरुण खासदारांची संख्या चांगली आहे. भारताच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृती ज्यांना माहिती आहेत, त्यांना याची कल्पना आहे की आपल्याकडे १८ या अंकाचं सात्विक मूल्य आहे. गीतेचे १८ अध्याय आहेत. कर्म, कर्तव्य आणि करुणेचा संदेश आपल्याला त्यातून मिळतो. पुराण, उपपुराणांची संख्याही १८ आहे. १८ चा मूलांक ९ आहे. ९ पूर्णतेची खात्री देतो. ९ पूर्णतेचं प्रतीक असणारा आकडा आहे. १८ वर्षं वयानंतर आपल्याकडे मतदानाचा अधिकार मिळतो. १८वी लोकसभा भारताच्या अमृतकाळातली आहे. हा एक शुभसंकेत आहे”, असं मोदी म्हणाले.

“प्रत्येकाला सोबत घेऊन देशसेवा करू”

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाला सोबत घेऊन देशसेवा करणार असल्याचं सांगितलं. “सरकार चालवण्यासाठी बहुमत असतं, पण देश चालवण्यासाठी सहमती गरजेची असते. त्यामुळे आमचा कायम हाच प्रयत्न असेल की प्रत्येकाच्या सहमतीने, प्रत्येकाला सोबत घेऊन देशाची सेवा करता यावी. १४० कोटी देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन संविधानाच्या नियमांचं पालन करून वेगाने निर्णय घेऊ”, असं आश्वासनही त्यांनी दिलं.